मेडिसीन फ्रॉम द स्काय : बीव्हीएलओएस ड्रोनच्या साहाय्याने औषधे वितरित करणारे तेलंगणा देशातील पहिले राज्य
- ११ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ड्रोनच्या साहाय्याने प्राथमिक आरोग्यकेंद्रांना औषधे पाठविण्यासाठी तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यात मेडिसीन फ्रॉम द स्काय (एमएफटीएस) उपक्रमाचा शुभारंभ केला.
- यासह तेलंगणा पेलोड वितरित करण्यासाठी बियॉन्ड व्हिज्युअल लाईन ऑफ साईट (बीव्हीएलओएस) साठी ड्रोनचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे.
साहाय्य :
- तेलंगणा आयटी विभागाच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाली तेलंगणा सरकारचा एमएफटीएस हा उपक्रम आहे. जागतिक आर्थिक मंच (डब्लूईएफ), निती आयोग तसेच हेल्थ नेट ग्लोबल (अपोलो हॉस्पिटल) यांच्या साहाय्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला.
- हैदराबादमध्ये पार पडलेल्या विंग्स-२०२० कार्यक्रमादरम्यान तेलंगणा सरकारने एमएफटीएस कार्यक्रमासाठी डब्ल्यूईएफसमवेत भागीदारी केली होती.
प्रथम वितरण :
- पहिले वितरण दिल्लीच्या ड्रोन डिलिव्हरी टेक फर्म स्काय एअर मोबिलिटीद्वारा त्याच्या कन्सोर्टियम पार्टनर ब्लू डार्ट एक्स्प्रेससाठी केली होती.
- यात विकाराबाद जिल्हा रुग्णालयापासून ३ किमी अंतरावर असलेल्या सामुदायिक आरोग्य केंद्रापर्यंत ५ किलो वजनाची लसपेटी १० मिनिटांत पोहोचविण्यात आली.
ड्रोनची रचना :
- पीएएफआय आणि मारुत (Marut) ड्रोन्स यांनी संयुक्तपणे विशेषत: वैद्यकीय पेलोडसाठी या ड्रोनची रचना केली आहे.
- हे चार प्रकारचे बॉक्स घेऊन जाऊ शकते आणि प्रत्येक बॉक्स वेगवेगळ्या तापमानाचे नियंत्रण करेल.
- एका बॉक्सचे तापमान २-८ डिग्री सेल्सिअस असेल व त्यात लस ठेवता येऊ शकतात.
- तसेच १५-२४ डिग्री सेल्सिअस तापमानाच्या बॉक्समध्ये रक्ताची ने-आण करता येईल. म्हणजेच एकाच टप्प्यात प्राथमिक आरोग्य सेवा केंद्राला आवश्यक सर्व बाबी पोहोचवता येणे सहज शक्य होईल.
उपयोग :
- या प्रकल्पाच्या माध्यमातून गरजेच्या ठिकाणी, दुर्गम आणि ग्रामीण भागात विना अडथळा जीवनावश्यक औषधे, लस आणि रक्ताचे सहज वितरण करता येते.
मुख्य मुद्दे :
- या प्रकल्पाचे आठ कन्सोर्टियम भाग आहे. त्यापैकी तिघांनी त्यांची चाचणी उड्डाणे सुरू केली आहेत.
अ) ब्लू डार्ट मेड एक्स्प्रेस कन्सोर्टियम (स्काय एयर मोबिलीच्या साहाय्याने)
ब) हेलिकॉप्टर कन्सोर्टियम (मारूत ड्रोन)
क) क्यूरिसफ्लाई कन्सोर्टियम (टेक ईगल इनोव्हेशन)
- हा प्रकल्प उदारीकृत नवीन ड्रोन नियमांचा परिणाम असून याअंतर्गत फॉर्मची संख्या २५ वरून ५ करण्यात आली आहे, तसेच शुल्काचे प्रकारही ७२ वरून ७ करण्यात आले आहे.
- मेडिसीन फ्रॉम द स्काय प्रकल्पास पुढील ६ ते १२ महिन्यांत देशातील इतर राज्यांतही लागू करण्यात येणार आहे.