मेघालयाच्या राज्यपालपदी सत्यपाल मलिक
- गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मेघालयाच्या राज्यपालपदी नेमणूक केली आहे.
- याव्यतिरिक्त महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गोवा राज्याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.
- सत्यपाल मलिक यांनी यापूर्वी बिहार, तसेच जम्मू आणि काश्मिर राज्यांची राज्यपालपद भूषविली आहे.
- जम्मू-काश्मिरमध्ये जेव्हा कलम ३७० हटवण्यात आले. त्यावेळी तिथे सत्यपाल मलिक तत्कालीन राज्यपाल म्हणून नियुक्त होते.
राज्यपाल पद –
- घटक राज्याचा प्रथम नागरिक
- भारताच्या राज्यघटनेच्या १५३ व्या कलमान्वये प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल मात्र ७ वी घटनादुरुस्ती १९५६ अन्वये एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांच्या राज्यपालपदी नेमणूक करता येते.
- नेमणूक : राष्ट्रपतीद्वारे
- कार्यकाल – पदग्रहणापासून ५ वर्षे (राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत)
- भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल – सरोजिनी नायडू (उत्तरप्रदेश)
- महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल – श्रीप्रकाश (डिसेंबर १९५६ ते एप्रिल १९६२)
- महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल – विजयालक्ष्मी पंडित (१९६२ – ६४)