मुलींनाही देता येईल एनडीए प्रवेशपरीक्षा

मुलींनाही देता येईल एनडीए प्रवेशपरीक्षा

 • भारतीय संरक्षण दलाच्या पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (NDA – National Defence Academy) प्रवेशपरीक्षा आता मुलींनाही देता येईल. या बाबतचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने १८ ऑगस्ट २०२१ रोजी दिला.
 • या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय लष्करात अधिकाऱ्यांची भरती केली जाते.
 • ही परीक्षा फक्त पुरुषांनाच देण्याचा अधिकार होता त्यामुळे याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती.
 • अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांना या परीक्षेमध्ये फक्त पुरुषांना प्रवेश हा निर्णय राष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेण्यात आल्याचे न्यायालयात सांगितले.
 • मात्र लष्कराचा हा निर्णय लिंगभेदावर आधारित आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले.
 • NDA परीक्षा – १६ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थी आणि १२वी उत्तीर्ण उमेदवार ही परीक्षा देऊ शकतो.
 • ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. (UPSC – Union Public Service Commission)
 • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी – (NDA)
 • स्थापना – १९५४, खडकवासला, पुणे.
 • तिन्ही सुरक्षा सेवांसंबंधी असणारी जगातली पहिली संरक्षण प्रबोधिनी.

Contact Us

  Enquire Now