मुंबई शेअर बाजाराची पहिल्यांदाच ५० हजारांपर्यंत उसळी
- अमेरिकेतील सत्तांतराचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअर बाजारात २१ जानेवारीस दिसून आले.
- बाजार खुला होताच सेन्सेक्सने ५० हजारांचा ऐतिहासिक टप्पा पार केला.
- सेन्सेक्स ५००९६.५७ अंशांला सुरू होऊन ४९६२४.७६ अंशांवर बंद झाला.
- दिवसाअखेर निफ्टीचा पीई रेशो ३९.४९, तर सेन्सेक्सचा पीई रेशो ३४.४२ एवढा झाला.
- मागील वर्षी, २३ मार्चला २५.९७१ अंशांचा तळ गाठलेल्या सेन्सेक्सने जेमतेम १० महिन्यातच दुप्पट पल्ला गाठला.
शेअर बाजार वर जाण्याची कारणे
अ) अमेरिकेतील सत्तांतर
ब) परकीय गुंतवणूकदार संस्थांनी सातत्याने केलेली गुंतवणूक
क) लोकांची शेअर बाजार आणि म्युच्यूअल फंडातील गुंतवणूक
ड) २०२१ चे अंदाजपत्रक
इ) TCS, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजीज् आणि एचडीएफसी बँक यांची मजबूत कमाई
सेन्सेक्स म्हणजे काय?
- सेन्सेक्सची सुरुवात १९८६ साली झाली होती.
- सेन्सेक्स भारतीय शेअर मार्केटचा बेंचमार्क इंडेक्स आहे, जो BSE (Bombay Stock Exchange) मधील प्रमुख ३० कंपन्यांची तेजी किंवा मंदीची स्थिती दर्शवितो.
- हा संपूर्ण शेअर बाजाराचे चित्र दर्शवितो म्हणून शेअर बजारांमध्ये खूप महत्त्व आहे.
- या ३० कंपन्यांच्या शेअर्सची किंमत वाढली असता सेन्सेक्स वर जातो तर शेअर्सची किंमत कमी झाल्यास सेन्सेक्स खाली येतो.
- सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी काही महत्त्वपूर्ण कंपन्या
-
- बजाज फायनान्स
- SBI
- HDFC Bank
- टाटा स्टील
- HCL Technologies
- Axis Bank
- Infosys
- Mahindra
- Reliance Industries
BSE : (Bombay Stock Exchange) – बॉम्बे स्टॉक एक्सचेंज
- सुरुवात : १८७५
- भारतीय सर्वात जुना स्टॉक एक्सचेंज
- ५ हजारांपेक्षा जास्त कंपन्यांचा समावेश
- BSE च्या निर्देशांकाला ‘सेन्सेक्स’ म्हटले जाते.
NSE (National Stock Exchange) – नॅशनल स्टॉक एक्सचेंज
- सुरुवात : १९९२
- भारतातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज
- भारतात सर्वात जास्त शेअर्स खरेदी व विक्रीचे व्यवहार NSE वर होतात.
- NSE च्या निर्देशांकाला ‘निफ्टी’ असे म्हटले जाते.
सेन्सेक्सची वाटचाल :
- १९९० : शेअर निर्देशांक १००० अंकांनी वधारला
- १९९१ : चलन फुगवट्याचे संकट
- १९९२ : मुक्त अर्थव्यवस्थेचे निदर्शक असलेला पहिला अर्थसंकल्प
- १९९२ : हर्षद मेहता शेअर बाझार घोटाळा
- १९९२ : सेबीला वैधानिक दर्जा
- १९९९ : कारगिल युद्ध
- १९९९ – २००० : माहिती तंत्रज्ञान क्रांती – निर्देशांक ७ हजारांच्या वर
- २००१ : अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला
- २००४ : यूपीए सरकार
- २००६ : जागतिक बाजारपेठेत व्यापारी मालाची खरेदीत वाढ १०००० चा टप्पा पूर्ण
- २००७ : आंतरराष्ट्रीय रोकड सुलभतेत वाढ; २०००० टप्पा पूर्ण
- २०००७-०८ : जागतिक वित्तीय संकट
- २०१६ : ५०० व १००० च्या नोटा रद्द
- २०१७ : निर्देशांकाचा ३०००० टप्पा पूर्ण
- २०१७ : जीएसटी कराची अंमलबजावणी
- २०१८ : पीएनबी घोटाळा, निर्देशांकाचा ४०००० चा टप्पा पूर्ण
- २०२० : एनडीए सरकार – कॉर्पोरेट करात कपात
- २०२० : कोविड – १९ – अर्थव्यवस्थेला जबर धक्का
- २०२१ : कोविड – १९ लशीच्या वापरास मान्यता; सेन्सेकची ५०००० पर्यंत उसळी