मिताली राज पुन्हा पहिल्या क्रमांकावर
- एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय टीमची कर्णधार मिताली राज ही आयसीसी महिला फलंदाज(ODI) रँकिंगमध्ये पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आली आहे.
- अव्वल क्रमांकावर येण्याची ही तिची एकुणात नववी वेळ आहे.
- सर्वोत्तम दहामध्ये मिताली राज नंतर एकदिवसीय सामन्यातील फलंदाजांमध्ये नवव्या क्रमांकावर भारताचीच स्मृती मानधना आहे.
- एकदिवसीय सामन्यांमध्ये आयसीसीच्या हे सर्वोत्तम दहा गोलंदाजांमध्ये झुलन गोस्वामी आणि पूनम यादव अनुक्रमे पाचव्या व नवव्या क्रमांकावर आहेत.
- तर टीट्वेण्टीमध्ये भारताची शेफाली वर्मा ही पहिल्या क्रमांकावरची फलंदाज आहे. स्मृती मानधना यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
- टीट्वेण्टीमध्ये आयसीसीच्या हे सर्वोत्तम दहा गोलंदाजांमध्ये दीप्ती शर्मा आणि पूनम यादव अनुक्रमे सहाव्या व आठव्या क्रमांकावर आहेत.