माळढोक वाचविण्यासाठी भूमिगत वीजतारा

माळढोक वाचविण्यासाठी भूमिगत वीजतारा

 • देहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी 18 माळढोक थर वाळवंटी प्रदेशात वीज तारांवर आदळून मृत्युमुखी पडतात.
 • मृत्युमुखी पडणाऱ्या पक्ष्यांची संख्या आता 100 वर येऊन ठेपली आहे.
 • फक्‍त भारत आणि पाकिस्तानात आढळणारा हा पक्षी नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 • या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वीजतारा भूमिगत करण्याचे आदेश दिले आहेत.
 • या व्यतिरिक्त माळरान अधिवास वाचवणे, भटक्या कुत्र्यांमुळे व इतर जंगली प्राण्यांमुळे होणारा त्रास कमी करणे, माळढोक प्रजनन कार्यक्रम राबविणे, यापुढे येणाऱ्या सौर व पवन ऊर्जेवर चालणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांवर बंदी घालणे या महत्त्वाच्या सूचना याचिकेद्वारे करण्यात आल्या आहेत.
 • त्यावर 19 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान व गुजरात येथील माळढोक पक्ष्याच्या अधिवासातील सर्व वीजतारांना येत्या एका वर्षात भूमिगत करण्याचे आदेश दिले.

माळढोक पक्षी

 • शास्त्रीय नाव – Ardeotis Nigriceps
 • माळढोक हा भारतात आणि भारताला लागून असलेल्या पाकिस्तानमधील कोरड्या प्रांतामध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ पक्षी आहे.
 • या पक्ष्याच्या संवर्धनासाठी अनेक राज्य सरकारांनी ठोस पावले उचलली आहेत.
 • याला इंग्रजीत ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणतात.
 • मोठे, उभे शरीर, उंच पाय यामुळे शहामृगासारखा दिसणारा हा पक्षी उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वात जड पक्ष्यांपैकी एक आहे.
 • 2011 मध्ये माळढोक पक्ष्यांची संख्या केवळ 250 इतकी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
 • 2018 मध्ये ही संख्या 150 वर आली आहे.
 • 1972 च्या वन्यजीव संरक्षण अधिनियमाद्वारे या पक्ष्याला संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
 • याचे मुख्य खाद्य छोटे व मोठे किडे, टोळ, बिया, छोटी झुडपे इ. आहे.

आढळ

 • माळढोक पक्षी भारतामध्ये फक्त आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व राजस्थान या राज्यांत आढळतो.
 • महाराष्ट्रात हा पक्षी साधारणपणे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजे अहमदनगर, नागपूर व बीड जिल्ह्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात आढळतो.
 • सोलापूरजवळील नान्नज अभयारण्य हे या पक्ष्यासाठी संरक्षित अभयारण्य स्थापन केले आहे.
 • महाराष्ट्रातील हे अभयारण्य आकाराने सर्वात मोठे आहे.
 • माळढोक हा राजस्थान राज्याचा राज्यपक्षी आहे.

Contact Us

  Enquire Now