मालवाहू विमान खरेदीला मंजुरी
- सुरक्षाविषयक केंद्रीय समितीने स्पेनच्या ‘मेसर्स एअरक्स डिफेन्स आणि स्पेस एस ए’ कडून भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ एमडब्ल्यू मालवाहू विमान खरेदी करण्यासाठी मंजुरी
- एकूण ५६ सी – २९५ एमडब्ल्यू विमाने हवाई दलासाठी घेण्यात येणार आहेत.
- स्पेनमधून उड्डाणास तयार स्थितीतील १६ विमाने आणि ४० विमानांची निर्मिती भारतातच केली जाणार आहे.
- ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत ह्या विमानाची निर्मिती केली जाणार आहे.
- टाटा कन्सोर्टिमद्वारे चाळीस विमानांची निर्मिती भारतात पुढील दहा वर्षांत केली जाणार आहे.
- सर्व ५६ विमानांमध्ये स्वदेशी ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट’ बसविण्यात येणार आहे. हा प्रकल्प भारतातील एअरोस्पेस संस्थेला चालना देईल.
- त्यामुळे देशातील अनेक सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योग हे विमानाच्या सुटया भागांच्या निर्मितीमुळे सहभागी होतील.
- सी-२९५ एमडब्ल्यूची वैशिष्टे
- पाच ते दहा टन क्षमतेची वाहतूक करणारे मालवाहू विमान
- समकालीन तंत्रज्ञानाने सुसज्ज
- हे मालवाहू विमान जुन्या ‘एवरो विमानांची जागा घेईल.
- विमानाला मागच्या बाजूला जलद प्रतिसादासाठी आणि सैन्य व वस्तू पॅराशूटद्वारे सोडण्यासाठी दरवाजा.