माऊंट सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक
- इंडोनेशियाच्या माऊंट सेमेरू ज्वालामुखीचा उद्रेक डिसेंबर २०२१मध्ये सुरू झाला.
- ग्रेट माउंटन म्हणून ओळखला जाणारा हा इंडोनेशियातील सर्वात उंच ज्वालामुखी आहे.
- हा ज्वालामुखी पॅसिफिक महासागराभोवतालच्या पट्ट्यामध्ये येतो.
पॅसिफिकचे अग्निकंकण
- पॅसिफिक महासागराच्या भोवतालच्या पट्ट्यामध्ये जगातील ७५% ज्वालामुखी व ९० टक्के भूकंप होतात.
- त्यामुळे या पट्ट्याला पॅसिफिकचे अग्निकंकण म्हणतात.
- त्याची लांबी अंदाजे ४०००० किमी असून पश्चिमेला सुंदाप्लेट ते पूर्वेला पश्चिम पेरू किनाऱ्यापर्यंतचे (नाझका भूपट्ट) क्षेत्र व्यापतो.
क्राकाटोआ बेट
- इंडोनेशियातील जावा-सुमात्रा बेटांमध्ये क्राकाटोआ नावाचे बेट होते. १८८३ साली झालेल्या ज्वालामुखी उद्रेकांत पूर्ण बेटच गडप झाले.
- १९२७मध्ये याच जागेवर ज्वालामुखी उद्रेक होऊन नवीन बेट जन्माला आले. त्याला ‘अनक क्राकाटोआ’ असे नाव दिले आहे. अनक म्हणजे बाल.