महिलांवरील गुन्ह्यांबाबत राज्य सरकारचे कायदे कठोर
- ॲसिडहल्ला किंवा सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असलेला कायदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
- महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती’ हा नवीन कायदा निर्माण करण्यात आला असून विधेयक हिवाळी अधिवेशनात मोडण्यात येणार आहे.
शक्ती कायद्याबद्दल
- समाजमाध्यमांतून महिलांची बदनामी करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे हाही गुन्हा ठरवण्यात आला आहे.
- तसेच बलात्कार, विनयभंग, ॲसिडहल्ला याबाबत खोटी तक्रार करणे, पोलिसांना सहकार्य न करणे हेही गुन्हेच ठरवण्यात आले आहेत.
- सामूहिक बलात्कार करून हत्या केल्यास/मृत्यू झाल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
- बलात्कारपीडित, विनयभंग, ॲसिडहल्ला झालेल्यांची नावे उघड करण्यास बंदी व ते भंग करणाऱ्यास २ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
- ओळखीच्या व्यक्तीनेच बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप व दंडाची शिक्षा
- १६ वर्षांखालील मुलीवर बलात्कारासाठी मरेपर्यंत जन्मठेप.
- सामूहिक बलात्कार प्रकरणी २० वर्षांपर्यंत कठोर जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप व १० लाख रु. दंड किंवा मृत्युदंड