
महासमृद्धी महिला सशक्तीकरण अभियान
- राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत जागतिक महिला दिनी (८ मार्च) महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान सुरू करण्यात आले.
- या अभियान काळात शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचवून त्यांचा त्यांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला बचतगटांना प्रदर्शने तसेच सहकारी आणि मोठ्या मॉलमध्ये उत्पादनांच्या विक्रीची संधी उपलब्ध करून देणे.
- महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी शेत दोघांचे : (७/१२ वर पती व पत्नीचे नाव लावणे) आणि घर दोघांचे (नमुना नंबर ८ वर पती व पत्नीचे नाव लावणे) या संकल्पने अंतर्गत मालमत्तेवर पती व पत्नीचे नाव लावणे, महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना पोषणांबद्दल मार्गदर्शन करणे, महिलांमधील तंबाखूमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीरमुक्ती आदीबाबत जनजागृती करणे. महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढविणे, पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
- जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत पातळीवर मेळावे, प्रदर्शने आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.
- राज्य ग्रामविकास मंत्री – हसन मुश्रीफ