महाशल्यविशारदपदी विवेक मूर्ती यांची निवड केली

 

महाशल्यविशारदपदी विवेक मूर्ती यांची निवड केली.

 

 • भारतीय अमेरिकी वंशाच्या विवेक मूर्ती यांच्यावर बायडेन यांनी कोरोनासारख्या आव्हानात्मक काळात महत्वाची जबाबदारी टाकली आहे.
 • विवेक मूर्ती यांनी ओबामा यांच्याकाळात महाशल्यविशारद म्हणून काम केले होते पण नंतर ट्रम्प सत्तेवर येताच त्यांना पद सोडावे लागले होते.
 • या पदावर सर्वात तरुण वयात येण्याचा मान डॉ. मूर्ती यांना मिळाला होता. त्यावेळी बायडेन उपराष्ट्राध्यक्ष होते.
 • अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे माजी आयुक्‍त डेव्हिड केस्लर यांच्याबरोबर ते कोरोना कार्यगटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतील.

विवेक मूर्ती – 

 • जन्म – 10 जुलै 1977, हडर्सफील्ड, युनायटेड किंगडम
 • शिक्षण – हार्वर्ड विद्यापीठ, येल स्कूल ऑफ मेडिसीन
 • -विवेक मूर्ती हे लठ्ठपणा, तंबाखूशी संबंधीत समस्या आणि इतर आजारांशी लढा देण्याच्या प्रतिबद्धतेसाठी प्रसिद्ध आहेत.

विशेष अनुभव आणि योगदान-

 • डॉ. विवेक मूर्ती यांना फिजीशियन म्हणून दोन दशकांच्या अनुभवासह संशोधक आणि सार्वजनिक आरोग्य सेवेत व्हाईस ॲडमिरल पदावरील कामाचा अनुभव आहे.
 • 1995 मध्ये त्यांनी बहीण रश्मी यांच्याबरोबर भारत आणि अमेरिकेत एड्‌सबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘व्हिजन्स’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.
 • 1997 मध्ये ग्रामीण भारतातील महिलांना आरोग्य कर्मचारी म्हणून प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत ते सहसंस्थापक होते.
 • 2008 मध्ये ओबामा यांच्या समर्थनार्थ ‘डॉक्टर्स फार अमेरिका’ या संघटनेची स्थापना केली.
 • सर्वांसाठी किफायतशीर दरात आरोग्यसेवा उपलब्ध करुन देणारी व्यवस्था निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट्य होते.

बायडेनच्या संघात अनेक भारतीय वंशाचे लोक –

 • राष्ट्रपती पदाच्या निवडणुक विजयानंतर जो बायडेन यांनी विवेक मूर्ती यांची कोविड-19 टास्क फोर्सच्या सह अध्यक्ष म्हणून नियुक्‍ती केली.
 • त्याचवेळी अन्य दोन भारतीयांनाही बायडेन प्रशासनात समिती प्रमुख म्हणून नेमण्यात आले.
 • त्यापैकी अरुण मुजुमदार यांना ऊर्जा विभाग आणि किरण आहुजा यांना कार्मिक व्यवस्थापन म्हणून जबाबदारी देण्यात आली.
 • अतुल गावंडे आणि सेलिन गौंडर यांचा कोविड-19 टास्क फोर्समध्ये समावेश होता.
 • याशिवाय इतर 19 भारतीयांचाही बायडेन प्रशासनात सहभाग आहे.

Contact Us

  Enquire Now