महालेखापरीक्षक जी. सी. मुर्मू यांची IAEAच्या बाह्य लेखापरीक्षकपदी नियुक्ती
- भारताचे महालेखापरीक्षक (CAG – Comptroller and Audit General) जी. सी. मुर्मू यांची आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या (IAEA – International Atomic Energy Agency) च्या बाह्यलेखापरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- त्यांचा कार्यकाळ 2022 ते 2028 पर्यंत असेल.
- गुजरात केडरचे आयएएस अधिकारी असलेल्या मुर्मू यांना 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली.
- त्यानंतर त्यांनी एक वर्षात राजीनामा दिला व लगेचच त्यांची नियुक्ती भारताचे 14वे महालेखापरीक्षक म्हणून करण्यात आली.
IAEA – International Atomic Energy Agency
- स्थापना – 29 जुलै, 1957
- मुख्यालय – व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
- सदस्य – 173
- अध्यक्ष – राफेल ग्रोसी, अर्जेंटिना