महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव पुरस्कार २०२०चा न. म. जोशी तर २०२१चा डॉ. अनिल अवचट यांना जाहीर
- महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा “महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव पुरस्कार” साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांना (२०२०चा) आणि डॉ. अनिल अवचट (२०२१) यांना जाहीर झाला आहे.
- तसेच वाङ्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कोल्हापूर येथील सुनिलकुमार लवटे (२०२०) आणि इंदूर येथील मोहन रेडगावकर (२०२१) यांना “डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
- ११५ ह्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- डॉ. न. म. जोशी आणि डॉ. अनिल अवचट यांना त्यांनी लेखनातून केलेल्या साहित्य सेवेबद्दल ‘मसाप’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
- वाचन आणि साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल सुनिलकुमार लवटे आणि मोहन रेडगांवकरांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
- डॉ. न. म. जोशी यांना अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.
- बालसाहित्यामध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीला या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते.
महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप)
- स्थापना : १९०६
- एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली.
- चौथे ग्रंथकार संमेलन १९०६ साली कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात भरलेल्या संमेलनात साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली.
- तेव्हापासून मसाप मराठी भाषा साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे.