महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाकडून ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्रे

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाकडून ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रमाणपत्रे

 • बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाकडून ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित तब्बल १० लाख प्रमाणपत्रे जारी करण्यात येणार आहे. यामुळे बनावट प्रमाणपत्रांना आळा घालणे शक्य होणार आहे.
 • या प्रणालीमुळे डिजिटल कागदपत्रांची अवघ्या काही क्षणात जगभरात कोठूनही ऑनलाईन पडताळणी करता येणार आहे.

ब्लॉकचेन तंत्रज्ञान 

 • कल्पना करा की तुम्ही एखादे औषध खरेदी केले. त्यावरील बारकोड जर स्कॅन केला तर ते औषध कोणत्या होलसेलरकडून प्राप्त झाले, त्याचे उत्पादन कोठे आणि कधी झाले (अगदी वेळसुद्धा!) इ. माहिती अगदी सहज प्राप्त झाली तर!
 • हो तर हे शक्य आहे आणि विश्वासार्हही आहे. त्यासाठी आवश्यकता आहे ती ब्लॉकचेन तंत्रज्ञान क्रांतीची
 • तामिळनाडू राज्याने नुकतेच ‘राज्य ब्लॉकचेन धोरण’ जाहीर केले आहे. ज्यात जमिनीच्या नोंदीपासून शेतमालाच्या निरिक्षणांपर्यंत ब्लॉकचेनचा वापर व्हावा असे स्पष्ट नमूद केले आहे.
 • निती आयोगाकडूनही भारताची ब्लॉकचेनसंबंधी रणनीती कशी असावी यावर भाष्य करणारा ५९ पानांचा अहवाल जाहीर झाला आहे (भाग-१). त्यात वैद्यकीय क्षेत्रापासून शिक्षण क्षेत्रासंबंधी बाबींमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येऊ शकतो यावर भाष्य केले आहे.
 • महाराष्ट्रदेखील लवकरच ‘राज्य ब्लॉकचेन धोरण’ जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.

तर काय आहे हे ब्लॉकचेन तंत्रज्ञान?

 • ब्लॉकचेन ही असंख्य ब्लॉक्सची एक साखळी आहे. माहितीची विशिष्ट साठवणक्षमता असणाऱ्या प्रत्येक ब्लॉकमध्ये हजारो व्यवहार नोंदवलेले असतात. दोन ब्लॉक्स एका हॅशने जोडलेली असतात. हा हॅश म्हणजे गुंतागुंतीच्या गणितांचा एक कोड असेल. एखाद्याला माहिती हॅक करायची असेल तर हा कोड सोडवावा लागेल. जो की जवळपास अशक्य आहे. त्यामुळे हे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित राहणार असल्याचा दावा केला जात आहे. या प्रत्येक ब्लॉकमध्ये यूजर्सचे व्यवहार डिजिटल रूपात साठवले जातील. जे त्या साखळीतील सर्वांना पाहता येणे शक्य आहे.
 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल सहीने हे व्यवहार सुरक्षित केलेले असतात. इतर कोणालाही या डिजिटल स्वाक्षरीत किंवा माहितीत बदल करणे जवळपास अशक्य आहे.

प्रत्येक व्यवहाराची नोंद व पारदर्शकता

 • या तंत्रज्ञानामध्ये प्रत्येक व्यवहाराची नोंद केली जाते. म्हणजेच सगळीच माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल.
 • समजा युरोपमधून भारतात सफरचंद आयात केली, तर ती सफरचंद कोणाच्या शेतातून आली आहेत, त्यावर कोणती औषधे मारली आहेत, त्यात काय कंटेंट आहे, सफरचंदांची गुणवत्ता, माल पाठवणारा मध्यस्थ, जहाज, आर्थिक माहिती या संबंधीच्या सर्व व्यवहारांची माहिती आपल्याला प्राप्त होईल आणि यातून निश्चितच पारदर्शकता वाढेल.

डिजिटल चलनाची सुरुवात

 • डिजिटल चलनासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान एक प्लॅटफॉर्म आहे. त्या अंतर्गत प्रत्यक्ष पैशाची देवघेव न करता पैशाचे व्यवहार होऊ शकतात. प्रत्यक्ष पैसा छापण्याची गरज संपून जाईल व काळा पैसा रोखला जाईल.
 • या तंत्रज्ञानाची उपयुक्तता ओळखून चीननेदेखील १ जानेवारी २०२० पासून डिजिटल चलनासाठीचा कायदा अस्तित्वात आणला आहे.
 • फेसबुकनेही आपले ‘लिब्रा’ नावाचे डिजिटल चलन बाजारात आणले आहे.

भारत आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर

 • भारत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल चलनाच्या विरोधात असला तरी भविष्यातील अपरिहार्यता पाहता इ-रुपया बाजारात आणावा लागेल.

Contact Us

  Enquire Now