महाराष्ट्र राज्यात कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण

महाराष्ट्र राज्यात कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण

 • महाराष्ट्र राज्य पर्यटन धोरण – २०१६ मधील तरतुदीनुसार व कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षित पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांचा खासगी वाहनांना प्राधान्य देण्याचा कल वाढला आहे.
 • यासाठीच राज्यात कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
 • या धोरणाची विभागणी दोन भागात केली आहे.

अ) कॅरॅव्हॅन

ब) कॅरॅव्हॅन पार्क

उद्देश 

 • राज्याच्या वैविध्यपूर्ण निसर्ग सौंदर्याचा पर्यटकांना लाभ
 • खासगी गुंतवणुकीस प्रोत्साहन
 • दुर्गम भागातील पर्यटनाला चालना देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
 • या धोरणासंदर्भात राज्यस्तरीय समिती असून पर्यटन विभागाचे सचिव अध्यक्ष असतील.

अ) कॅरॅव्हॅन पार्क

 • मूलभूत सोयी – सुविधांनी युक्त अशा जागेवर लहान-मोठ्या कॅरॅव्हॅन उभ्या  करून मुक्काम करता येईल.
 • हे पार्क खासगी किंवा शासकीय जमिनीवर स्वत: जमीन मालक किंवा विकासक उभारू शकतील.
 • पर्यटकांसाठी सुविधा – पाणी, रस्ते, वीजजोडणी, स्वच्छतागृहे, विकलांगांकरता व्हीलचेअर, सुरक्षाव्यवस्था इत्यादी
 • स्थानिक प्राधिकरणास यासंबंधित परवानग्या देण्याचा अधिकार कॅरॅव्हॅन पार्क एमटीडीसीच्या पर्यटक निवासांच्या परिसरात मोकळी जमीन किंवा कृषी पर्यटन क्षेत्रांच्या ठिकाणी उभारता येतील.

ब) कॅरॅव्हॅन

 • या व्हॅन्समध्ये किचन, बेड, टॉयलेट, सोफा, टेबल असून विश्रांती आणि निवासाची सोय
 • प्रकार:
 • सिंगल एक्सेल कन्व्हेन्शनल कॅरॅव्हॅन
 • ट्विन एक्सेल कॅरॅव्हॅन
 • टेन्ट ट्रेलर
 • फोल्डिंग कॅरॅव्हॅन
 • कॅम्पर ट्रेलर
 • नोंदणी – परिवहन आयुक्तांकडे करावी.
 • कॅरॅव्हॅन पार्क, कॅरॅव्हॅन, हायब्रीड कॅरॅव्हॅन पार्क – पर्यटन संचालक
 • ऑनलाईन नोंदणी : www.maharashtratourism.gov.in
 • नोंदणी शुल्क : ५ हजार रुपये
 • नुतनीकरण : २ हजार रुपये

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (Maharashtra Tourism Development Corporation)

 • स्थापना : १९७५ (मुंबई)
 • कार्य : महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसायाला चालना देऊन विकास करण्यासाठी शासकीय उपाययोजना करणे
 • जागतिक पर्यटन दिवस : २० सप्टेंबर (थीम – २०२० – पर्यटन आणि ग्रामीण विकास)
 • राष्ट्रीय पर्यटन दिवस : २५ जानेवारी (थीम – २०२१ – देखो अपना देश)

Contact Us

  Enquire Now