महाराष्ट्राच्या चित्ररथावर कासपठाराचे दर्शन
- प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनात यंदा रानफुलांची ओळख असलेल्या कास पठार आणि ‘महाराष्ट्रातील जैवविविधता’ मानांकनाच्या समावेशावर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे.
- चित्ररथावर कासपठारावरील फुले आणि अन्य वन्य जीवाचे प्रतीकात्मक दर्शन घडवले जाणार आहे.
- या चित्ररथामध्ये कास पठाराप्रमाणे माळढोक पक्षी, ग्रेट इंडियन बस्टर्ड आणि खेकड्याच्या नवीन शोधलेल्या प्रजातीचे मॉडेल असणार आहे.
- दरवर्षी प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे संचलन होते.
- शेकरू हा राज्यप्राणी तर हरियाल हा राज्यपक्षी देखील प्रदर्शित केला जाणार आहे. ‘ब्लू नॉर्मन’ हे राज्य फुलपाखरू असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राज्याचा या चित्ररथात आठ फूट उंच आणि सहा फूट रुंद आकाराची फुलपाखराची प्रतिकृती सादर केली जाणार आहे.
- या कास पठाराच्या जागेचे जैववैविध्य महत्त्व लक्षात घेता युनेस्कोने (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना) २०१२ मध्ये कासला जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल केला आहे.