महाराष्ट्राची दिव्या देशमुख बनली भारताची २२वी महिला ग्रँडमास्टर

महाराष्ट्राची दिव्या देशमुख बनली भारताची २२वी महिला ग्रँडमास्टर

  • महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने भारताची २२वी महिला ग्रँडमास्टर ठरण्याचा मान पटकावला.
  • १६ वर्षीय दिव्या देशमुख ही महाराष्ट्राची सर्वात युवा ‘महिला ग्रँडमास्टर’ ठरली आहे.
  • हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली.
  • शेवटून दुसऱ्या फेरीत सिंगापूरच्या सिद्धार्थ जगदीशला बरोबरीत रोखल्याने दिव्याचा ‘महिला ग्रँडमास्टरसाठी’ आवश्यक तिसरा निकष पूर्ण झाला.
  • अखेरच्या फेरीत हंगेरीच्या पाप लेव्हेंटचा पराभव करत दिव्याने आंतरराष्ट्रीय मास्टरचा दुसरा निकष पूर्ण केला.
  • दिव्याला स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे १७.७ आंतरराष्ट्रीय गुण मिळाले.
  • २४ जुलै २००० मध्ये एस. विजयालक्ष्मी यांनी भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळविला होता.

निकष

  • ‘महिला ग्रँडमास्टरचा’ किताब पटकावण्यासाठी खेळाडूने एलो २३०० गुण आणि तीन निकष पूर्ण करणे गरजेचे असते.

Contact Us

    Enquire Now