
महानगरांपासून ५G सेवेला सुरुवात होणार
- २०२२ पासून देशातील महानगरे आणि प्रमुख शहरांमध्ये बहुप्रतीक्षित ५G सेवा सुरू केली जाणार असल्याची घोषणा, माहिती आणि दूरसंचार विभागाने केली.
५G तंत्रज्ञानाबद्दल
- ही एक पाचव्या पिढीतील मोबाईल नेटवर्कप्रणाली असून यामध्ये इंटरनेट वेग २०GBPS (गीगाबाइट्स प्रति सेकंद) इतका उच्च असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहे.
उत्क्रांती
- १G – ही प्रणाली १९८० च्या दशकात सुरू करण्यात आली, ज्यामध्ये फक्त व्हॉइस कॉलवर आधारित सेवा पुरवली जाते.
- २G – ही प्रणाली १९९० च्या दशकात सुरू करण्यात आली. याद्वारे डिजिटल रेडिओ सिग्नल वापरला जातो. यात व्हॉइस आणि डेटा ट्रान्स्मिशन सेवा पुरवली जाते. (६४ kbps)
- ३G – २००० च्या दशकात १mbps ते २mbps च्या गतीने सेवा सुरू करण्यात आली. यामध्ये व्हॉइस, व्हिडिओ कॉल यांचा समावेश आहे.
- ४G – ३D आभासी वास्तविकतेला सक्षम करणारे हे तंत्रज्ञान २००९ मध्ये सुरू करण्यात आले. (१००mbps ते १Gbps)
- ५G – उपयोग – ५G प्रणालीद्वारे वर्धित मोबाईल ब्रॉडबँड, प्रचंड IOT (इंटरनेट ऑफ थिंकिंग यासारख्या सेवा देण्यात येणार आहेत.
- आव्हाने – संपूर्ण भारतात फायबर कनेक्टिव्हिटी अपग्रेड करण्याची गरज आहे, जी सध्या केवळ ३०% दूरसंचार टॉवर्सना जोडते.
- भारताची ५G स्पेक्ट्रम किंमत जागतिक सरासरीपेक्षा कित्येक पट महाग आहे.
- भारताचे नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी (२०१८)
- या धोरणाद्वारे भारताने लवकरात लवकर चांगल्या नेटवर्क गतीसाठी ५G सुरू करण्याची योजना आखली होती.