मराठवाडा साहित्य परिषदेचे जीवनगौरव पुरस्कार कोतापल्ले व बोराडे यांना जाहीर
- मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे बोराडे व कोत्तापल्ले दोघांना ‘मसाप’चा जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.
- कोरोनामुळे २०२० या वर्षासाठीचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला नाही.
- त्यामुळे २०२०चा पुरस्कार प्राचार्य प्रतापराव बोराडे यांना तर २०२१चा पुरस्कार डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना देण्यात येणार आहे.
- दोघांनीही साहित्य परिषदेच्या उभारणीत केलेले कार्य, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची पायाभरणी व साहित्य परिषदेच्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून कुंपण घालणे आदी कामांत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
प्रतापराव बोराडे
- १५ वर्षापासून कोषाध्यपद स्वीकारले.
- बोराडे हे जवाहरलाल अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य असल्याने त्यांचा व्यावसायिक संस्थांशी संबंध होता.
नागनाथ कोतापल्ले
- विद्यार्थीदशेपासूनच मराठवाडा साहित्य परिषदेशी संबंध असलेले कोत्तापल्ले हे ‘प्रतिष्ठान’ नियतकालिकाचे दीर्घकाळ संपादक म्हणून कार्य
- परिषदेच्या साहित्य व्यवहारात २५ वर्षांपासून कार्य
- तीन कविता, आठ कथासंग्रह, दहा समीक्षाग्रंथ, वैचारिक व ललित लेखन असलेले ३५हून अधिक ग्रंथ
मराठवाडा साहित्य परिषद (मसाप)
- स्थापना – २९ सप्टेंबर १९४३
- मुखपत्र – प्रतिष्ठान, संपादक – आसाराम लोमटे
- मराठवाडा साहित्य परिषद – महाराष्ट्र साहित्य परिषदेची संलग्न संस्था आहे.
- १९४३ ला ‘दुसरे निजाम साहित्य संमेलन’ नांदेड येथे झाले, त्यावेळी त्या संमेलनात मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली.
- मराठवाडा साहित्य परिषद ग्रंथ प्रकाशकाचेही काम करते.