ममता बॅनर्जी (दीदी)

ममता बॅनर्जी (दीदी) :

 • जन्म : ५ जानेवारी १९५५ (वय ६६ वर्षे)
 • जन्मठिकाण : कोलकाता
 • कवी, चित्रकारण, राजकारणी
 • पक्ष
  • अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (१९९७ सद्य)
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९७० – १९९७)
 • पश्चिम बंगालच्या आठव्या मुख्यमंत्री (२०११ पासून)
 • शपथ : जगदीप धनखार (राज्यपाल)
 • शिक्षण : -बी. ए. (इतिहास)
  • एम. ए. (इस्लामचा इतिहास)
  • एल. एल. बी.
  • डी. लिट. कोलकाता विद्यापीठ

 राजकीय कारकीर्द :

 • १९७०-८० : महिला काँग्रेस (आय), पश्चिम बंगाल, सरचिटणीस
 • १९८४ : अखिल भारतीय युवा काँग्रेस (आय), सरचिटणीस
 • १९८५-८७ : अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण समितीच्या सदस्य
 • १९८७-८८ : राष्ट्रीय परिषदेच्या सदस्य
 • १९८९ : प्रदेश काँग्रेस समिती सदस्य
 • १९९० : पश्चिम बंगाल तरुण काँग्रेसच्या अध्यक्ष
 • १९९१ : केंद्रिय मनुष्यबळ विकास, महिला व बालविकास राज्यमंत्री
 • १९९७ : तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना
 • रेल्वेमंत्री : २००९-११, १९९९-२००१
 • २०११-२१ : पश्चिम बंगाल विधीमंडळच्या सदस्या
 • २००४ : कोळसा व खाणमंत्री
 • २०११-१६ : पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री (भवानीपूर मतदारसंघ)
 • २०१६-२१ : दुसऱ्यांदा मुख्यमंत्री
 • २०२१ : तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

मुख्यमंत्री पदावर असतानाची कारकीर्द :

 • शिक्षण तसेच आरोग्य क्षेत्रात सुधारणा
 • ३० एप्रिल २०१५ मध्ये ‘नादिया’ या जिल्ह्यास पहिला खुला शौचमुक्‍त जिल्हा म्हणून युनिसेफ इंडियाकडून गौरविण्यास आले.
 • जनतेला राज्याच्या संस्कृती व इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी कोलकाता मेट्रोच्या काही स्थानकांना स्वातंत्र्यसैनिक नेते, कवी, गायक, यांची नावे देण्याची योजना
 • इतर योजना : कन्याश्री प्रकल्प (१३ ते १८ वर्षांच्या मुलींसाठी शिष्यवृत्ती)
 • स्नेहालय प्रकल्प (पक्के घर)
 • जय बंगला योजना, २०२० (अनुसूचित जाती व जमाती – ६० वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींसाठी)
 • रुपश्री प्रकल्प (१८ वर्षेपूर्ण मुलीला लग्नासाठी रु. २५००० आर्थिक मदत)
 • कृषक बंधू योजना (शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य)
 • उत्कर्ष बांगला (पश्चिम बंगालमधील रहिवाश्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण)
 • सुफल बांगला (वाजवी दरात ताजा भाजीपाला पुरविणे)
 • सबला योजना (११ ते १८ वर्षे वयोगटातील मुलीचे आरोग्य व जीवनकौशल्याचा स्तर वाढविणे. 

इतर कार्ये :

 • शेतकऱ्यांना होणाऱ्या अन्यायाविरोधात ‘टाटा मोटर्सच्या नॅनो कारच्या सिंगूर येथील प्रकल्पास विरोध
 • दार्जिलिंग ते हिमालय रेल्वे तसेच भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडचा प्रस्ताव
 • ट्यूरंटो एक्सप्रेस, बांग्लादेश व नेपाळला जोडणारी ट्रान्स-आशियन रेल्वे

सन्मान :

 • २०१२ – टाईम मासिकातील जगातील सर्वात प्रभावशाली १०० व्यक्‍तींपैकी एक
 • २०१२ – ब्लूमबर्ग मासिकातील आर्थिक जगातील ५० प्रभावशाली व्यक्‍तींपैकी एक
 • २०१८ – स्कोच चीफ मिनिस्टर ऑफ द इयर
 • २४ मे २०१९ – ‘बगिनी’ हा ममता बॅनर्जी यांच्या जीवनपटावर आधारित बंगाली सिनेमा

पुस्तके :

अ) माय अनफॉरगटेबल मेमोरिज (२०१२)

ब) स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स (१९९८)

क) स्लॉटर ऑफ डेमोक्रॅसी (२००६)

Contact Us

  Enquire Now