मनरेगाअंतर्गत वेतनश्रेणीचे प्रवर्गानुसार विभाजन

मनरेगाअंतर्गत वेतनश्रेणीचे प्रवर्गानुसार विभाजन

 • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर यांसाठी वेगळ्या प्रवर्गात वेतनश्रेणीचे विभाजन करण्यात येणार आहे.

उद्देश

 • अनुसूचित जाती व जमातींसाठी अर्थसंकल्पीय योजनेतून होणाऱ्या लाभाचे मुल्यांकन करणे.
 • केंद्र या प्रवर्गासाठी काय करीत आहे, हे अधोरेखित करण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे.

संभाव्य धोका

 • यामुळे वेतनदेय प्रणाली गुंतागुंतीची बनू शकते.
 • योजनेच्या निधीत कपात होण्याची शक्यता.
 • वेतन देण्यास विलंब.
 • अधिक अनुसूचित जाती व जमाती लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात मनरेगा प्रतिबंधित केली जाऊ शकते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)

 • सुरुवात – ७ सप्टेंबर २००५ रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याची नोंदणी झाल्यानंतर २ फेब्रुवारी २००६ पासून सुरुवात
 • आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील बंदा पाली या गावातून योजनेस प्रारंभ
 • नावात बदल : २ ऑक्टोबर २००९, महात्मा गांधीजीच्या जयंती निमित्त मनरेगा चे नाव महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आले.
 • ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे पुरस्कृत
 • १ एप्रिल २००८ पासून मनरेगा देशातील ६६० जिल्ह्यांमध्ये ६८५१ तालुके व २, ५ ७, ७१० ग्रामपंचायतीमध्ये राबविली जात आहे.

याअंतर्गत दोन योजना समाविष्ट करण्यात आल्या

अ) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY)

ब) कामाच्या मोबदल्यात अन्नधान्य योजना (FFWP)

  • अकुशल कामगारांसाठी १०० दिवसांपर्यंत ग्रामीण रोजगाराची निर्मिती
  • मजुरी रोजगार दर निश्चित करण्यासाठी ग्राहक किंमत निर्देशाकांचा विचार केला जातो.
  • मजुरी व साधनसामग्रीसाठी केंद्र व राज्यातील खर्चाचे प्रमाण – ६०:४०

लाभार्थी कामगारांना मिळणारे लाभ

 • कामगारास नाव नोंदणी अर्ज केल्यानंतर जॉब कार्ड दिले जाते.
 • नोंदणीनंतर १५ दिवसांच्या आत ५ किमी अंतरात काम उपलब्ध करून दिले जाते.
 • ५ किमीपेक्षा अधिक अंतर असल्यास १०% अधिक मजुरी
 • नोंदणीनंतर १५ दिवसांत काम उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता 
 • स्त्री-पुरुषांना समान वेतन जे त्यांच्या बँक किंवा पोस्ट खात्यात जमा केले जाते.

मनरेगाअंतर्गत सर्वाधिक वेतन दर :

अ) हरियाणा : २५१ रुपये

ब) केरळ : २२९ रुपये

क) पंजाब : २१० रुपये

 • महाराष्ट्रातील वेतन दर : १८१ रुपये प्रति दिवस प्रति कामगार
 • कामाचे निर्धारण, अंमलबजावणी व लेखापरीक्षणाचे काम करण्यासाठी ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका पार पाडते.

Contact Us

  Enquire Now