मणिपूरच्या हथेई मिरची आणि तामेंगलाँग संत्र्यास जीआय टॅग

मणिपूरच्या हथेई मिरची आणि तामेंगलाँग संत्र्यास जीआय टॅग

  • मणिपूरची दोन प्रसिद्ध उत्पादने हथेई मिरची आणि तामेंगलाँग संत्र्यास जीआय टॅग प्राप्त झाला आहे.

हथेई मिरची (सिराखोंग मिरची) :

  • इंफाळपासून ६६ किमी अंतरावर असलेल्या सिराखोंग गावाची हवामान स्थिती या मिरचीच्या वाढीसाठी तसेच तिची गुणवत्ता, विशिष्ट चव आणि रंगाच्या बाबतीत अनुकूल आहे.
  • सिराखोंगच्या आसपास ३०० हेक्टर डोंगरावर सेंद्रीय पद्धतीने या मिरचीची लागवड केली जाते.
  • ही उत्तम अँटी-ऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. त्याचप्रमाणे कॅल्शियम आणि क जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे..

तामेंगलाँग मंडारिन संत्रे :

  • हे संत्रे आकाराने मोठे असून त्याचे सरासरी वजन २३२.७६ ग्रॅम आहे.
  • यास विशिष्ट आंबट-गोड चव असते.
  • यातील रसाचे प्रमाण ४५ टक्के आहे व ॲस्कॉर्बिक ॲसिडचे प्रमाण ४८.१२ मिग्रॅ/१०० मिली इतके आहे.

जी आय टॅग विषयी :

  • जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्य राष्ट्रांना व त्यांच्या राज्यांना त्यांचे शेती उत्पादन, खाद्य पदार्थ तसेच कलाकुसरीच्या वस्तू व एखाद्या विशिष्ट प्रदेशातील प्राण्यांनाही जी आय टॅग दिला जातो. 
  • यामुळे वस्तू अथवा पदार्थाचे उगमस्थान, त्यांचा इतिहास व भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व यासंबंधी खात्रीशीर माहिती मिळते; त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट प्रदेशास व राष्ट्रास त्या वस्तूची बौद्धिक मालकी प्राप्त होते.

संरक्षण

  • जी आय टॅगला १८८३ च्या पॅरिस करारानुसार बौद्धिक मालमत्ता हक्क (आयपीआर) म्हणून संरक्षण प्रदान करण्यात आले आहे.
  • यासाठी १९९९ मध्ये डब्लूटीओने जिओग्राफिकल इंडिकेशन ऑफ गुड्‌स रजिस्ट्रेशन ॲण्ड प्रोटेक्शन हा कायदा पारित केला व १५ सप्टेंबर २००३ पासून तो अंमलात आणण्यास सुरुवात झाली.

फायदा :

  • जी आय टॅग प्राप्त उत्पादनांच्या डुप्लिकेशनला प्रतिबंध व त्या विशिष्ट प्रदेशातील उत्पादक आणि रोजगाराच्या महसूल उत्पादनातही वाढ होण्यास मदत.

इतर :

  • भारतात पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग चहास (२००४-०५) प्रथम जी आय टॅग मिळाला होता.

सर्वाधिक जी आय टॅग प्राप्त राज्ये :

१) कर्नाटक (४१)

२) तमिळनाडू (३८)

३) महाराष्ट्र, केरळ (२९)

Contact Us

    Enquire Now