मंगोलियन कांजूर हस्तलिखिताचे पुनर्मुद्रित खंड प्रकाशित
- नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स् (एनएमएम) अंतर्गत संस्कृती मंत्रालयाने मंगोलियन कांजूरच्या १०८ खंडांचे पुनर्मुद्रण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
- ४ जुलै २०२० रोजी गुरुपौर्णिमा (धर्म चक्र दिवस) या दिवशी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना प्रथम पाच हस्तलिखिते सादर केली गेली.
- त्यानंतर मंगोलियाचे राजदूत गोन्चिंग गॅनबोल्ड यांना अल्पसंख्याक राज्यमंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पर्यटन मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंग पटेल यांच्या हस्ते एक संच देण्यात आला.
- मिशनचा उद्देश दुर्मिळ आणि अप्रकाशित हस्तलिखिते प्रकाशित करणे असून याद्वारे त्यामध्ये निहित ज्ञान संशोधक, विद्वान आणि सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकेल.
- मंगोलियन कांजूरचे सर्व १०८ खंड मार्च २०२२ पर्यंत प्रकाशित केले जातील, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक खंडामध्ये मंगोलियन भाषेत सूत्राचे मूळ शीर्षक दर्शविणारी सामग्री असेल. मंगोलियन कांजूरच्या १०८ खंडातील बौद्ध कॅनॉनिकल मजकूर मंगोलियामधील सर्वात महत्त्वाचा धार्मिक मजकूर आहे.
- ‘कांजूर’ म्हणजे ‘संक्षिप्त आदेश’, भगवान बुद्धांचे शब्द. ‘मंगोलियन कांजूर’ हे मंगोलियाला सांस्कृतिक ओळख प्रदान करण्याचे स्रोत आहे.
- १९७० च्या दशकात प्रा. लोकेश चंद्र (राज्यसभेचे माजी खासदार) यांनी १०८ खंडांतील ‘मंगोलियन कांजूर’ प्रकाशित केले होते. सध्याची आवृत्ती नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स् (एनएमएम) द्वारा प्रकाशित केली जात आहे.
- नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट्स् (एनएमएम): भारत सरकारकडून फेब्रुवारी २००३ मध्ये पर्यटन व संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत हस्तलिखितांसाठी एनएमएम सुरू करण्यात आले.
- हे मिशन प्रख्यात विद्वान प्रा. लोकेश चंद्र यांच्या देखरेखीखाली चालते.
भारत-मंगोलिया संबंध :
- ख्रिश्चन काळाच्या सुरुवातीला बौद्ध धर्म भारतीय सांस्कृतिक आणि धार्मिक राजदूतांनी मंगोलियाला नेला.
- मंगोलियाशी औपचारिक मुत्सद्दी संबंध १९५५ मध्ये स्थापन झाले.
- मंगोलियन कांजूरचे प्रकाशन देशांमधील सांस्कृतिक वृत्तीचे प्रतीक म्हणून काम करेल.
मंगोलियाबद्दल : अध्यक्ष- खाल्टमागीन बत्तुल्गा, राजधानी- उलानबातर, चलन- मंगोलियन टोग्रोग (तुग्रीक).