भूजल पातळीत झपाट्याने घट : केंद्रीय भूजल मंडळ

भूजल पातळीत झपाट्याने घट : केंद्रीय भूजल मंडळ

 • केंद्रीय भूजल मंडळाने नुकतेच केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ३३% विहिरींच्या भूजलात  २ मीटरपर्यंत घट झाल्याचे समोर झाले आहे.
 • नवी दिल्ली, चेन्नई, इंदूर, कानपूर, लखनौ या शहरांमध्ये ही घट ४ मीटर्सपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.
 • केंद्रीय भूजल मंडळाद्वारे देशभरातील भूजल पातळीचे नियमितपणे निरीक्षण केले जाते.

भारतातील भूजल उत्खनन :

 • युनेस्कोच्या २०१८ मधील अहवालानुसार जगातील सर्वाधिक भूजलाचा उपसा भारताद्वारे केला जातो.
 • केंद्रीय भूजल मंडळानुसार भारतामध्ये शेतजमीन सिंचनासाठी तब्बल २३० अब्ज घनमीटर भूजल दरवर्षी काढले जाते.
 • भारतातील एकूण भूजल क्षर अंदाजे १२२-१९९ अब्ज घन मीटर्स या श्रेणीत आहे.

भूजल उपसण्याचे कारण :

 • हरितक्रांती – हरितक्रांतीमुळे पीक उत्पादकता वाढली. वाढत्या पाण्याची गरज भागवण्यासाठी अनियंत्रित भूजल उपसा करण्यात येत आहे.
 • अपुरे नियमन – भूजल उपशावर कोणतेही नियमन नसल्याने त्याचा उपसा अनियंत्रित आहे.
 • केंद्र निधी – पाणी हा राज्य विषय आहे. त्यामुळे भूजल उपसा-भरणा नियंत्रण यांसारख्या गोष्टीत राज्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र राज्यांना निधीसाठी केंद्रसरकार अवलंबून रहावे लागत आहे.

केंद्र सरकारच्या भूजल संवर्धनासाठीच्या काही योजना 

 • जलशक्ती अभियान
 • सुरुवात – २०१९
 • उद्देश – भारतातील पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या २५६ जिल्ह्यांमध्ये भूजलसह पाण्याची उपलब्धता वाढविणे.

राष्ट्रीय जलधोरण २०१२

 • या धोरणांतर्गत पावसाचे पाणी जमिनीत पुनर्भरण करून पुन्हा वापरण्यावर भर दिला आहे.

अटल भूजल योजना

 • सुरुवात – २५ डिसेंबर २०१९
 • जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केलेल्या या योजनेनुसार भूजलाच्या शाश्वत वापरावर भर दिला आहे.

जलसंधारणामध्ये राज्यांचे प्रयत्न

 • मुख्यमंत्री जल स्वावलंबन अभियान – राजस्थान
 • सुजलाम सुफलाम अभियान – गुजरात
 • जलयुक्त शिवार – महाराष्ट्र
 • मिशन काकतिया – तेलंगणा
 • नीरू चेट्टू (Neeru Chettu) – आंध्रप्रदेश
 • जल जीवन हरियाली – बिहारी
 • जल ही जीवन – हरियाणा

Contact Us

  Enquire Now