भारत-युरोपियन युनियन वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान सहाकार्यावरील कराराचे पुढील पाच वर्षांसाठी (२०२०-२०२५) नूतनीकरण
- २५ जुलै २०२० रोजी भारत आणि युरोपियन युनियनने (EU – European Union) वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान सहकार्यावरील कराराचे नूतनीकरण करण्यासाठी भागीदारी करण्याचे मान्य केले.
- पहिल्यांदा हा करार २३ नोव्हेंबर २००१ रोजी झाला. तसेच २००७ व २०१५ असे दोनदा नूतनीकरण केले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पंधराव्या भारत युनियन शिखर परिषदेदरम्यान दोन्ही देशांनी या कराराच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला.
- युरोपियन युनियन प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन या होत्या.
- परस्पर कायदा आणि परस्पर व्यवहार या तत्त्वांवर आधारित असलेल्या या करारामुळे संशोधन आणि नवकल्पनांमध्ये आणखी सहयोग होईल.
- मागील पाच वर्षांत ७३ संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्यात आले आहेत, ज्याचा परिणाम सुमारे २०० संयुक्त संशोधन प्रकाशने व काही पेटंट आहे.
- गेल्या पाच वर्षांत परवडणारी ऊर्जा, आरोग्यसेवा, पाणी, अन्न यांसारख्या सामाजिक आव्हानांना तोंड देण्यास या कराराचे सहकार्य मिळाले आहे.
युरोपियन युनियन :
- युरोपियन युनियनची स्थापना १ नोव्हेंबर १९९३ ला झाली असून मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम येथे आहे.
- जर्मनी, फ्रान्स, इटली, नेदरलँड, बेल्जियम, लक्झेम्बर्ग हे संस्थापक सदस्य देश आहेत.
- युनियनने सध्या २७ युरोपियन युनियन देशाची गणना युनियनमध्ये केली आहे.
- सध्या युरोपियन संसदेचे अध्यक्ष डेव्हिड मारिया ससोली हे आहेत.
- ३१ जानेवारी २०२० रोजी ब्रिटनने या संघातून माघार घेतली आहे.