भारत मालदीवमध्ये क्रिकेट स्टेडियम आणि 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारणार

भारत  मालदीवमध्ये क्रिकेट स्टेडियम आणि 100 खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारणार

  • मालदीवच्या 800 दशलक्ष डॉलर्सच्या क्रेडिट लाइन (LOC) अंतर्गत हुलहुमले येथे 100 खाटांचे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारले जाईल. हा प्रकल्प आरोग्य क्षेत्रामध्ये आधीच असलेल्या द्वीपक्षीय सहकार्यावर आधारित आहे.
  • अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून एक आधुनिक क्रिकेट स्टेडियम आणि 22000 प्रेक्षकांना बसविण्याची क्षमतादेखील हुलहुमले येथील 800 दशलक्ष डॉलर्सच्या एलओसी अंतर्गत येईल.
  • भारताच्या एक्स्पोर्ट – इम्पोर्ट बँक (एक्झिम)ने मालदीवमधील पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी एलओसी वाढविला.
  • रुग्णालयाच्या बांधणीमुळे आरोग्य क्षेत्रातील देशांमधील द्विपक्षीय सहकार्य बळकट होईल.
  • सेंट्रल पार्कच्या विकासासाठी आणि हुमहुमले येथे ‘अराईव्हल जेट्टी’च्या नूतनीकरणासाठी भारत हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मालदीवच्या सहकार्याने काम करेल, याचा फायदा पर्यटक व रहिवाशांना होईल.

भारत मालदीवला डोर्नियर विमान देणार 

  • विशेष आर्थिक क्षेत्रांवरील पाळत ठेवण्यासाठी आणि दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी भारताने मालदीवला डोर्नियर विमान दिले आहे.
  • हे विमान मालदीव नॅशनल डीफेन्स फोर्स (MDNF) चालवणार आहे आणि चालू खर्च भारत वहन करेल.
  • डोर्नियर एअरक्राफ्टची विनंती मालदीवचे तत्कालीन अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी 2016 मध्ये भारत दौऱ्यावेळी केली होती.

अलिकडील संबंधित :

  • 14 ऑगस्ट 2020 रोजी भारताने क्रेंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुब्रह्मण्यम्‌ जयशंकर आणि मालदीवचे अब्दुल्ला शाहीद यांच्यात झालेल्या आभासी संभाषणादरम्यान अर्थसंकल्पीय समर्थन म्हणून 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आणि 6.7 कि.मी. ग्रेटर मेल कनेक्टिव्हिटी प्रोजेक्टसाठी 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दिले आहेत.

मालदीव प्रजासत्ताकबद्दल :

अध्यक्ष – इब्राहिम मोहम्मद सोलिह

राजधानी – माले

चलन – मालदिवी रूफ़िया

 

Contact Us

    Enquire Now