भारत ब्रिटनमधील दुसरा सर्वात मोठा परकीय गुंतवणूकदार
- युनायटेड किंग्डम आंतरराष्ट्रीय व्यापार विभागाच्या नवीन अहवालानुसार भारत यूकेमधील युनायटेड स्टेट्स्नंतर दुसरा सर्वात मोठा परकीय गुंतवणूकदार ठरला आहे.
- २०१८-१९ सालात भारताने यूकेमधील १०६ प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करून तिथे ४,८५८ नोकर्या निर्माण केल्या होत्या तर २०१९-२०२० या वर्षांत भारताने १२० प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवून ५,४२९ नव्या नोकर्या निर्माण केल्या आहेत.
- परकीय गुंतवणुकीमधून ब्रिटनमध्ये एकूणाच्या २९% नोकर्या निर्माण झाल्या आहेत.
युनायटेड किंग्डमबद्दल :
१) हा देश इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉदर्न आयलंड या बेट समूहांनी बनलेला आहे.
२) राजधानी- लंडन
३) प्रधानमंत्री- बोरिस जॉन्सन
४) राष्ट्रप्रमुख- राणी एलिझाबेथ (दुसरी)