भारत तांदूळ निर्यातीत प्रथम स्थानावर

भारत तांदूळ निर्यातीत प्रथम स्थानावर

 • पाऊस तसेच अनुकूल हवामानामुळे उत्तरेकडील राज्यात तांदळाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली.
 • मागील काही वर्षांच्या तुलनेत २०२०-२१ या वर्षात तांदळाचे १२ कोटी टनांपर्यंत उत्पादन झाले आहे.
 • परिणामी, भारत चीननंतर तांदळाच्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
 • जगात १४५ लाख टनांपर्यंत तांदळाची निर्यात करून जगातील प्रथम क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश बनला आहे.
 • भारतातून बासमती व नॉन बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.
 • लोहसमृद्ध लाल तांदूळ रासायनिक खताचा वापर न करता आसाम – ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात पिकवला जातो.

जग आणि तांदूळ उत्पादन

अ) २०२०-२१ – ५०.३१ कोटी टन

ब) २०१९-२० – ११.८४ कोटी टन

क) २०१८-१९ – ११.६४ कोटी टन

 

 • तांदूळ आयातदार देश
क्र. देश आयात (लाख टन)
युरोपियन देश २५
फिलिपाइन्स २३
चीन २२
अरब देश १५
मलेशिया ११

 

 • निर्यातदार देश
क्र. देश निर्यात (%)
भारत ३१.५
थायलंड १९.२
युनायटेड स्टेट्स ८.६
व्हिएतनाम ६.६

तांदूळ 

 • भारतातील तांदळाच्या जाती – बासमती, आंबेमोहोर, सोना मसूरी, कोलम, जिरगा, चंपा
 • छत्तीसगडमध्ये पिकवल्या जाणाऱ्या गटवान, महाराजी व लिचा या तीन जातीत कर्करोगाशी लढण्याची क्षमता

भात पिकावरील किडी व रोग

अ) कीड – खोडकिडा, तुडतुडे, लष्करी अळी

ब) रोग – करपा

Contact Us

  Enquire Now