भारत गौरव योजना
- देशातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने २३ नोव्हेंबर २०२१ रोजी भारत गौरव योजनेची घोषणा केली.
- या योजनेअंतर्गत रामायण एक्स्प्रेसच्या धर्तीवर थीम – आधारित टुरिस्ट सर्किट ट्रेन खासगी किंवा सरकारी मालकीच्या ऑपरेटरद्वारे चालवल्या जाऊ शकतात.
योजनेची वैशिष्ट्ये
१) योजनेअंतर्गत कोणतीही संस्था, कंपनी किंवा व्यक्ती रेल्वे मंत्रालयाकडून गाड्या भाडे तत्त्वावर घेऊन चालवू शकेल.
२) यासाठी कमीत कमी दोन ते जास्तीत जास्त रेल्वे डब्यांचे आयुष्य (३५ वर्षे) पर्यंत करार करता येणार आहे.
३) यावेळी कंपनीला रेल्वेचा मार्ग, थांबे, आतमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच तिकिटाचे दरही ठरविता येतील; मात्र भारतीय रेल्वेप्रमाणे साधारण प्रवासी वाहतुकीसाठी या गाड्यांचा वापर करता येणार नाही.
४) ते पर्यटकांना रेल्वे प्रवास, हॉटेल निवास आणि प्रेक्षणीय स्थळांची व्यवस्था, ऐतिहासिक/वारसा स्थळांना भेट, सहल मार्गदर्शक आदींसह सर्वसमावेशक पॅकेज ऑफर करतील.
५) सेवा प्रदाते रेल्वेच्या डब्यांवर आणि आतल्या बाजूला जाहिराती लावू शकतात तसेच रेल्वेमध्ये कोणते खाद्यपदार्थ दिले जातील याबाबत स्वातंत्र्य
फायदे
- भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भव्य ऐतिहासिक ठिकाणांची भारतीयांना तसेच जागतिक पातळीवर ओळख करून देण्यास सहाय्य
- भारताच्या पर्यटनास प्रोत्साहन
रेल्वे मंत्रालयाचे सध्याचे निर्णय
- १ जुलै २०२० रेल्वे मंत्रालयाने १०९ जोड्यांमधील १५१ ट्रेन खासगी क्षेत्राद्वारे चालवल्या जातील अशी घोषणा केली आहे.
- १२ क्लस्टर्समध्ये २०२३ मध्ये खासगी गाड्या तात्पुरत्या स्वरूपात सुरू होतील.
- खासगी कंपन्यांना त्यांच्या पसंतीच्या स्रोतातून लोकोमोटिव्ह आणि गाड्या घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल.
भारतातील थीम – आधारित पर्यटन सर्किट रेल्वे
अ) रामायण एक्स्प्रेस (भगवान रामाशी संबंधित स्थाने)
ब) गुरू कृपा (गुरू नानकांशी संबंधित स्थाने)
रेल्वे आणि पर्यटन मंत्रालयाशी संबंधित इतर योजना
१) स्वदेश दर्शन योजना (२०१४-१५)
२) प्रसाद योजना (२०१४-१५) (तीर्थक्षेत्र संवर्धन आणि आध्यात्मिक विकासासाठी)
३) देखो अपना देश (१४ एप्रिल २०२०)
प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता अहवाल- २०१९ नुसार, भारत एकूण १४० देशांपैकी ३४ व्या क्रमांकावर होता, हे भारतातील पर्यटन विकासासंबंधी देशाच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करते.