भारत – उझबेकिस्तान यांच्यात ९ करार

भारत – उझबेकिस्तान यांच्यात ९ करार

  • भारत – उझबेकिस्तानमध्ये गुरुवारी ९ करार झाले. त्यात विविध क्षेत्रात सहकार्य करण्याचे मान्य करण्यात आले. 
  • पंतप्रधान मोदी व उझबेकिस्तान अध्यक्ष शौकत मिर्झीयोयेव यांत झालेल्या आभासी शिखर बैठकीत द्विपक्षीय गुंतवणूक करार तडीस नेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
  • दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमध्ये सर्व पातळ्यांवरील दहशतवादाचा निषेध, दशहतवाद्यांची आश्रयस्थाने, निधीचे मार्ग बंद करण्याचा निर्धार व्यक्त केला.
  • संयुक्त निवेदनात अफगाणिस्तानला भारत व उझबेकिस्तान यांनी एकमुखी पाठिंबा दिला व व्यापार-करारांना गती देण्याचे व तेथील शांतता प्रक्रिया टिकवून ठेवण्याचेही मान्य केले.
  • लष्करी औषध, लष्करी शिक्षणात सहकार्य वाढवण्यासाठी, उझबेकिस्तानात सशस्त्र सेना अकादमीमध्ये माहिती तंत्रज्ञान संकुल विकसित करण्याच्या कराराचा यात समावेश आहे.
  • भारताचे तारकंद येथे व उझबेकिस्तानचे नवी दिल्ली येथे दूतावास आहेत.
  • भारत-उझबेकिस्तान संबंध सोव्हियत काळापासून आहेत. भारतीय नेते अनेकदा ताश्कंद आणि इतर ठिकाणी भेट देत.
  • पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे पाकिस्तान सोबतच्या युद्धानंतर ताश्कंद येथील करारानंतर तेथेच निधन झाले होते.

Contact Us

    Enquire Now