- भारत आणि व्हीएतनामलाउद्योगांकडून प्राधान्य-
- कोरोना मुळे अनेक जागतिक कंपन्या चीनमधून बाहेर पडून अन्य पर्यायांच्या शोधामध्ये भारत आणि व्हिएतनामला प्राधान्य देत आहेत.
- परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे आयोजित इकॉनॉमिक डायलॉग या परिषदेत ‘बिल्डिंग रिलायेबल ग्लोबल सप्लाय चेन्स’ या विषयावर परिसंवाद साधला.
- परिषदेचे अध्यक्ष पुणे इंटरनॅशनल सेंटरचे विश्वस्त गणेश नटराजन हे होते.
- परिषदेत राजीव बजाज यांनी भारत आणि व्हिएतनाम हे उत्पादन केंद्र म्हणून उदयास येत आहेत असे म्हटले आहे.
- व्हिएतनामने कोरोना साथ आटोक्यात ठेवण्यात यश मिळवले आहे त्यामुळे जपान, अमेरिका, कोरिया, सिंगापूरमधील कंपन्या प्रयत्नांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत.
- व्हिएतनाम सरकारने पायाभूत संरचना प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. 2020 मध्ये व्हिएतनामचा आर्थिक विकास दर जगात सर्वाधिक होता म्हणून इलेक्ट्रॉनिक्स, कापड, पादत्राणे, स्वयंचलित उपकरणे या उद्योगांमध्ये जगतिक आघाडीच्या कंपन्या तेथे गुंतवणूक करत आहेत.
कोरोनामुळे जागतिक पुरवठा साखळीतील वातावरण बदलले आहे व कंपन्यांनी कमी जोखमीचे धोरण स्वीकारले आहे त्यामुळे येत्या काळात बाजारपेठेची उपलब्धता सुरक्षिततेची आव्हाने या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.