भारत आणि रशिया दरम्यान एके-१०३ खरेदीचा करार
- देशाच्या संरक्षण विभागाला मजबूत करण्यासाठी भारताने आपत्कालीन खरेदी अंतर्गत रशियाकडून ७०,००० अॅसाॅल्ट रायफल्सच्या खरेदी संदर्भात २० ऑगस्ट २०२१ रोजी करार केला आहे.
- मेगा पायदळ आधुनिकीकरण कार्यक्रमाचा हा भाग आहे.
- यातील बहुतांशी अॅसाॅल्ट रायफली व केए- २२६५ हेलिकॉप्टर्स हे हवाई दलासाठी खरेदी करण्यात येणार आहेत.
पार्श्वभूमी:
- भारतीय लष्कराने २०१७ मध्ये सुमारे ७,००,००० रायफल्स, ४४,६०० कार्बाईन्स आणि ४४,००० लाईट मशीन गन घेण्याची प्रक्रिया सुरू केली.
- सप्टेंबर २०२० मध्ये संरक्षण मंत्रालय आणि रशियन प्रतिनिधींनी ‘मेक-इन-इंडिया’ कार्यक्रमांतर्गत भारतात ६ लाख एके -४७ २०३ रायफल्स तयार करण्यासाठी एक मोठा करार केला. ह्या इंडो-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे तयार केले जातील.
कराराची ठळक वैशिष्ट्ये:
- ही रायफल इंडो-रशिया रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड (IRRPL) च्या संयुक्त उपक्रमांतर्गत तयार केली जाईल. एका रायफलची किंमत जवळजवळ ११०० डॉलर्स असून, यात उत्पादन युनिटच्या स्थापनेचा तसेच तंत्रज्ञान-हस्तांतरणाचा खर्च समाविष्ट आहे.
- लष्कराची १.५ लाख नवीन अॅसाॅल्ट रायफल्सची गरज भागविण्यासाठी ७०,००० एके-१०३ अॅसाॅल्ट रायफल खरेदीसाठी आणिबाणीच्या तरतुदींनुसार ३०० कोटी रुपयांचा करार करण्यात आलेला आहे.
एके-१०३ खरेदी कराराचे महत्त्व:
- भारतात सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांना अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्याने सोडलेली शस्त्रे सापडण्याची शक्यता आहे, या धर्तीवर होणारा हा करार भारतीय हवाई दलाची ताकद वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
मेगा आधुनिकीकरण योजना:
- भारतीय लष्कर मोठ्या संख्येने लाइट मशीन गन, बॅटल कार्बाईन्स आणि अॅसॉल्ट रायफल्स खरेदी करत आहे, जे त्याच्या पूर्वीच्या शस्त्रांची जागा घेतील.
- एके- १०३ रायफल या सध्याच्या लष्करातील INSAS रायफल्सची जागा घेतील.