भारत आणि यूके यांच्यातील जागतिक नवोन्मेष भागीदारीवरील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची कार्योत्तर मंजुरी

भारत आणि यूके यांच्यातील जागतिक नवोन्मेष भागीदारीवरील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची कार्योत्तर मंजुरी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकारचे परराष्ट्र मंत्रालय आणि युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालय (FCDO) यांच्यातील जागतिक नवोन्मेष भागीदारीवरील (ग्लोबल इनोव्हेशन पार्टनरशिप) सामंजस्य नवोन्मेष (MoU)ने कार्योत्तर मंजुरी दिली आहे.

उद्दिष्टे 

  • जीआयपीद्वारे भारतीय नवोन्मेषकांना इतर देशांत (विकसनशील देशांत) त्यांच्या नवसंकल्पनांमध्ये वाढ करण्यास पाठिंबा मिळेल. जेणेकरून त्यांना नवीन बाजारपेठ शोधण्यात आणि आत्मनिर्भर होण्यास मदत हाेईल.
  • यामुळे भारतातील नवोन्मेष क्षेत्रातील वातावरणाला देखील चालना मिळेल.
  • जीआयपी नाविन्यता शाश्वत विकासाशी (SDG) संबंधित क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल ज्यायोगे देशांना त्यांचे SDG मिळविण्यात मदत होईल.
  • निधी, अनुदान, गुंतवणूक आणि तांत्रिक सहाय्य या माध्यमातून ही भागीदारी भारतीय उद्योजकांना आपल्या नवकल्पनांसाठी सहाय्य करण्यास मदत करेल.
  • जीआयपी अंतर्गत निवडलेल्या नवकल्पनांमुळे शाश्वत विकासाचे लक्ष्य पूर्ण करण्याला गती मिळेल आणि निम्न स्तरावरील लोकसंख्येला त्याचा फायदा होईल. ज्यामुळे देशांमध्ये समानता आणि सर्वसमावेशकता वाढीस लागेल.
  • या करारान्वये दोन्ही देशांतील नवोन्मेष संकल्पनांच्या देवाणघेवाणीलाही सुरुवात होऊन सर्वसमावेशक इ मार्केट प्लेस (इ-बाझार) विकसित होईल.
  • परिणामांवर आधारित मूल्यांकनावर लक्ष केंद्रीत होऊन परिणामी पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वृद्धिंगत होईल.

Contact Us

    Enquire Now