भारत आणि कोविडविरोधी भूमिका

भारत आणि कोविडविरोधी भूमिका

अ) मिशन कोविड सुरक्षा :

  • आत्मनिर्भर भारत ३.० अभियानांतर्गत स्वदेशी कोविड प्रतिबंधक लसींचा विकास व उत्पादनाची गती वाढविण्यासाठी केंद्र सरकारने मे २०२१ मध्ये ही योजना जाहीर केली.
  • जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी), नवी दिल्ली येथे जैवतंत्रज्ञान विभागाकडून याची अंमलबजावणी केली जात आहे.

ब) दोन जैवतंत्रज्ञान संस्थांचे केंद्रीय औषध प्रयोगशाळा म्हणून अद्ययावतीकरण केले गेले;

  1. i) राष्ट्रीय पशु-जैवतंत्रज्ञान संस्था (NIAB), हैदराबाद
  2. ii) राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (NCCS), पुणे
  • त्यासाठी निधी पीएम केअर फंडातून दिला जाणार आहे.

क) क्लिनिकल चाचण्यांना गती देण्यासाठी भागीदारी (PACT) : परराष्ट्र मंत्रालय व जैवतंत्रज्ञान विभागाच्या (डीबीटी) भागीदारीने शेजारील देशांत कोविड लसींच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेला उपक्रम.

ड) कोविड निदान आणि चाचणी : हब आणि स्पोक मॉडेलचा भाग म्हणून डीबीटीद्वारा कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी २१ शहर/प्रादेशिक क्लस्टर्स नेमण्यात आले.

Contact Us

    Enquire Now