भारत आणि अवकाश क्षेत्र :
- भारताचा औद्योगिक विस्तार तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीसाठी अंतराळ क्षेत्र प्रमुख उत्प्रेरकाची भूमिका बजावत आहे.
- अंतराळाशी निगडित क्रियाकलापांमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविणे, हा अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा मुख्य हेतू आहे.
- यामुळे भारतातील या क्षेत्राच्या वाढीस गती प्राप्त होईल व रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास सहाय्य होईल.
- १९६० च्या दशकात भारतातील अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांनी अंतराळ संशोधन उपक्रमास सुरुवात केली.
- अंतराळ संशोधनाची गरज ओळखून १९६२मध्ये अणुऊर्जा विभागांतर्गत अवकाश संशोधनासाठी भारतीय राष्ट्रीय समिती (INCOSPAR) स्थापन करण्यात आली.
- १९६९ साली याच समितीचे रूपांतर इस्रोमध्ये करण्यात आले.
- सध्या जगातील सहावी मोठी अंतराळ संशोधन संस्था म्हणून इस्रो ओळखली जाते.
- भारताकडे कम्युनिकेशन उपग्रह (INSAT) व रिमोट सेन्सिंग उपग्रहांचा सर्वात मोठा ताफा असून पृथ्वी निरीक्षण त्याचप्रमाणे जलद व विश्वासार्ह संप्रेषण यांची वाढत्या मागणीची ते पूर्तता करतात.
- नव्याने स्थापन झालेले ‘भारतीय राष्ट्रीय अवकाश प्रोत्साहन आणि प्राधिकरण केंद्र’ हे खासगी कंपन्यांना भारतीय अवकाश पायाभूत सुविधांच्या समान वापरासाठी एक पार्श्वभूमी प्रदान करते.