भारत-अमेरिका मानवरहित हवाई प्रक्षेपण यान प्रकल्प

भारत-अमेरिका मानवरहित हवाई प्रक्षेपण यान प्रकल्प

  • भारताचे संरक्षण मंत्रालय आणि अमेरिकेचा संरक्षण विभाग यांच्यात ३ सप्टेंबर २०२१ रोजी मानवरहित हवाई प्रक्षेपण यान करार करण्यात आला.
  • हा करार संरक्षण उपकरणाच्या सह-विकासाद्वारे दोन्ही देशांदरम्यान तंत्रज्ञान सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
  • मानवरहित हवाई प्रक्षेपण यानाच्या प्रोटोटाइपच्या संयुक्त विकासासाठी प्रणालींची रचना, विकास, प्रात्यक्षिक चाचणी याबाबत सहकार्याची रूपरेषा आखण्यात आली आहे.
  • या करारावर भारतीय हवाईदलाचे सहाय्यक प्रमुख एअर व्हाईस मार्शल नर्मदेश्वर तिवारी आणि अमेरिकेचे सुरक्षा सहकार्य संचालक ब्रिगेडियर जनरल ब्रायन ब्रकबर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

Contact Us

    Enquire Now