भारतीय हवामानशास्राच्या अंदाजानुसार यंदाही सरासरीपेक्षाही जास्त पाऊस
- देशात नैर्ऋत्य मौसमी पावसाचे प्रमाण दीर्घ कालावधीसाठी ९६ ते १०४ टक्क्यांपर्यंत असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
- देशात जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा मौसमी पाऊस साधारणत: दीर्घ कालावधीसाठी सरासरी पर्जन्य मानाच्या १०१ टक्के एवढा होईल.
- १९६१ ते २०१० कालावधीत देशाची मान्सून पावसाची सरासरी ८८ सेंटीमीटर म्हणजेच ८८० मिलीमीटर आहे.
- तर सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस साधारण मानले जाते.
- स्टॅटिस्टिकल एन्सेंबल फोरकास्टिंग सिस्टिम मॉडेलचा वापर करून मान्सून हंगामातील पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
- सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता ४० टक्के तर दुष्काळाची शक्यता ८ टक्के असल्याचे स्पष्ट केले आहे.
- यंदा प्रशांत महासागरात ला-लिना स्थिती तयार झाल्याने नैर्ऋत्य मान्सूनला त्याचा थेट लाभ होण्याची शक्यता आहे.
- महाराष्ट्रात जून महिन्यात मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे, तर कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता
विभागनिहाय अंदाज
- वायव्य भारत – ९२ ते १०८ टक्के
- मध्य भारत – १०६ टक्के
- ईशान्य भारत – ९५ टक्के
- दक्षिण भारत – ९३ ते १०७ टक्के