भारतीय वंशाची तिसरी अवकाश वीरांगना – सिरिषा बांदला
- एअरोनॉटिकल इंजिनिअर सिरिषा बांदला अवकाशात झेपावणारी भारतीय वंशाची तिसरी महिला ठरली आहे. (कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स)
- तिने अमेरिकेच्या न्यू मेक्सिको येथून युनिटी 22 या यानातून आपल्या पाच सहकाऱ्यांसोबत उड्डाण केले.
यूनिटी 22
- व्हर्जिन गैलेक्टिकच्या 2022 सालापर्यंत अंतराळात व्यावसायिक सेवा सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग म्हणून हे यान सोडण्यात आले होते.
- 11 जुलै 2021 रोजी भारतीय वंशाच्या सिरिषा बांदला यांच्या सह व्हर्जिनचे संस्थापक रिचर्ड ब्रॉन्सन यांचादेखील या उड्डाणात सहभाग होता.
- अशा प्रकारच्या उड्डाणाला सबोर्बिटल उड्डाण अर्थात suborbital flight असे म्हणतात.
- जर एखादी वस्तू 28000 किमी/तासापेक्षा जास्त वेगाने प्रवास करत असेल तर ती पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण तोडून वरच्या कक्षेत जाईल.
- त्यावेळी अंतराळ प्रवाशांना काही मिनिटांचा वजनहिनपणा अनुभवता येतो.
- शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये केले जाणारे प्रयोग अशा उड्डाणांमुळे कमी खर्चिक ठरणार आहेत.