भारतीय लष्कराची ताकद वाढवणारी पाच राफेल अंबाला एअरबेसवर दाखल

भारतीय लष्कराची ताकद वाढवणारी पाच राफेल अंबाला एअरबेसवर दाखल

 • भारत व फ्रान्समध्ये सप्टेंबर २०१६ मध्ये आंतर-सरकारी ७.८७ अब्ज डॉलर्सचा करार झाला होता. या करारानंतर ४६ महिन्यांनी राफेल लढाऊ विमानांपैकी पहिली पाच विमाने २९ जुलै २०२० रोजी दुपारी अंबाला, हरियाणा बेसवर दाखल झाली.
 • २०१९ मध्ये दसर्‍याच्या मुर्हुतावर आणि भारतीय वायूसेनेच्या ८७ व्या वर्धापन दिनादिवशी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिले राफेल स्विकारले.
 • फ्रान्समधील बोर्डोक्स येथील हवाईदलावर राफेल हस्तांतराचा सोहळा पार पडला.
 • सप्टेंबर २०१६ मध्ये भारताने फ्रान्ससोबत हवाई दलासाठी ३६ राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी ८९००० कोटी, रुपयांचा करार केला होता.
 • ही सर्व विमाने २०२१ पर्यंत भारताला मिळणार आहेत.

राफेलसंबंधीचे ठळक मुद्दे 

 • फ्रान्समधील मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरून ते भारतातील अंबाला तळ दरम्यान सुमारे ८५०० किमी प्रवास दोन टप्प्यांमध्ये केला.
 • यातील पहिला ५८०० किमी चा टप्पा साडेसात तासात पूर्ण केला, तर दुसरा टप्प्यात २७०० किमीचे अंतर कापले.
 • या विमान प्रवासादरम्यान फ्रान्स हवाई दलाच्या FAF टँकरने हवेतल्या हवेत विमानांना इंधन पुरवठा केला.
 • या दोन टप्प्यांदरम्यान राफेल विमानांच्या ताफ्याने फ्रान्स नियंत्रित संयुक्त अरब अमिरातीमधील अल धाफरा हवाईतळावर थांबा घेतला.
 • ही विमाने १० सप्टेंबर २०१९ रोजी पुनरुत्थान झालेल्या ‘१७ स्क्वॉड्रन गोल्डन रो’चा एक भाग असतील. या स्क्वाड्रनची स्थापना १ ऑक्टोबर १९५१ रोजी अंबाला हवाई तळावर करण्यात आली होती.
 • ‘१७ स्क्वाड्रन, गोल्डन रोचे ब्रीदवाक्य – ‘उदयम्, अजस्रम्’ असे आहे.
 • अंबाला हे सामरिक महत्त्वाचे लष्करी तळ आहे. भारत पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेपासून हे हवाईतळ सुमारे २००-२२० किमी अंतरावर आहे. येथे ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात आहे. त्याचबरोबर हवाई दलाचे मिग-२१ ‘बायसन’ आणि जॅग्वार लढाऊ विमानाचे स्क्वाड्रनही येथेच तैनात आहे.
 • राफेलचे पहिले पथक अंबाला हवाई तळ येथे तर दुसरे पश्चिम बंगालच्या हासीमाय येथे तैनात केले जाईल.
 • पाच राफेल विमानांपैकी दोन जुळी ट्रेनर विमाने असून तीन सिंगल सीट फाइटर विमाने आहेत.
 • फ्रान्समधून आलेल्या विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केल्यावर INS कोलकाताने जलसलामी दिली होती.
 • वायुदलाजवळ सध्या मिग – २१, जॅग्वार, मिशन, LCA, मिग – २९ आणि सारखे फायटर जेट आहेत.

राफेलची वैशिष्ठ्ये

 • राफेल हे दोन इंजिन असलेले ‘ओमनीयेल’ म्हणजेच ‘सर्वगुणसंपन्न’ असे लढाऊ विमान आहे.
 • राफेल या शब्दाचा अर्थ ‘वार्‍याचा जोरदार झोत’ आणि ‘आगस्फोट’ किंवा ‘धुळीचे वादळ’ असादेखील होतो.
 • हवेतून मारा करणे, हवेतल्या हवेत इंधन भरणे, अण्वस्त्राचा हल्ला झाल्यावर संरक्षण, लक्ष्याच्या हालचाली टिपून त्यांच्यावर अचूक मारा करण्याची क्षमता हे राफेलचे महत्त्वाचे गुणधर्म आहेत.
 • यात मिटिऑर आणि स्काल्प अशी दोन क्षेपणास्त्र आहेत. ज्यामुळे ते भारताला हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता देईल. ही दोन्ही क्षेपणास्त्र यूएसपी (unique selling point) आहे.
 • राफेल एका मिनिटात ६०००० फूट उंचीपर्यंत जाऊ शकते, याची इंधन क्षमता १७००० किलो एवढी आहे.
 • राफेल विमान प्रत्येक प्रकारच्या वातावरणात एकाच वेळी अनेक कामे करण्यास सक्षम आहे, त्यामुळेच त्याला ‘मल्टिरोल फायर एअर क्राफ्ट’ असे देखील म्हणतात.
 • राफेलची मारक क्षमता ८७००० किमी पर्यंत आहे.
 • राफेल विमान २४५०० किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकते तर ६० तासाचे अतिरिक्त  उड्डाणही करू शकते.
 • राफेल विमानाचा वेग २२२३ किमी प्रति तास इतका आहे.
 • वायुसेना सध्या वापरत असलेल्या ‘मिशन २०००’ चीही सुधारित आवृत्ती आहे.
 • भारतीय वायुसेनेकडे ‘मिराज २०००’ विमाने आहेत.
 • राफेलची उंची ५.३० मी आहे तर त्याची लांबी १५-३० मी.
 • अफगाणिस्तान, लिबिया, माली, इराक आणि सिरिया या देशांमध्ये झालेल्या युद्धांमध्ये आतापर्यंत राफेलचा वापर करण्यात आला आहे. (लिबियामध्ये सर्वप्रथम)
 • राफेलची ‘व्हिजिबिलिटी’ ३६० अंशाची आहे. पायलटला फक्त शत्रू हेरून बटण दाबायचे, बाकी सगळे काम कॉमप्युटर करतो.
 • टीप – मिटीऑर हे हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे, नजरेपलीकडील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामध्ये आहे. हे क्षेपणास्त्र १२०-१५० किमी पर्यंत मारा करू शकते. तसेच हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्याचा नियोजित मार्ग बदलता येतो.
 • स्काल्प – हे हवेतून जमिनीवर मारा करणारे ३०० किमी क्षमता असलेले क्षेपणास्त्र आहे.

हॅमर – ही एक मार्गदर्शक शस्त्रप्रणाली आहे, डोंगराळ भागातील शत्रूने बनवलेले बंकट उद्धवस्त करण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. याला राफेलमधील ‘स्मार्ट बॉम्ब’ असेही म्हटले जाते.

Contact Us

  Enquire Now