भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेच्या संचालकपदी धृती बॅनर्जी

भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेच्या संचालपदी धृती बॅनर्जी

 • कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी धृती बॅनर्जी (वय 51) यांची नियुक्ती केली आहे.
 • गेल्या शंभर वर्षांमध्ये या संस्थेच्या संचालकपदी पहिल्यांदा महिला असणार आहे.
 • बॅनर्जी या सध्याचे संचालक डॉ. कैलाश चंद्रा यांची जागा घेतील.

धृती बॅनर्जी :

 • जन्म : 1970 (कोलकाता येथे)
 • प्राणीशास्त्रामध्ये एक शास्त्रज्ञ म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. 
 • तसेच त्यांचा प्राणीवर्गीकरण, प्राणी शरीर संरचना यांचा गाढा अभ्यास आहे.
 • 2012 पासून त्या भारतीय प्राणी शास्त्रीय सर्वेक्षणामध्ये डिजिटल सीक्वेन्स माहिती प्रकल्पाच्या समन्वयक आहेत. 

भारतीय प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण (Zoological Survey Of India)

 • 15 जानेवारी 1784 मध्ये विल्यम जोन्स यांनी स्थापन केलेल्या एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलमध्ये आपल्याला सदर संस्थेची बीजे सापडतात.
 • 1796 पासून एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलने प्राणी शास्त्राचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.
 • त्याची परिणती पुढे 1916मध्ये भारतीय प्राणी शास्त्रीय सर्वेक्षण या संस्थेच्या स्थापनेमध्ये झाली.
 • या संस्थेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.
 • पहिले संचालक : थॉमस नेल्सन अन्नंडेल
 • मीरा मनसुखानी या 1949 मध्ये या संस्थेमधील पहिल्या महिला वैज्ञानिक ठरल्या.

Contact Us

  Enquire Now