भारतीय कंपन्यांतील ३९ टक्के वरिष्ठ पदे महिलांच्या ताब्यात
- भारतीय कंपन्यांतील ३९ टक्के वरिष्ठ पातळीवरील मुख्य कार्यकारी पदांवर (CEO) महिला विराजमान असल्याचे ग्रँट थॉर्नटन या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे..
- कॉर्पोरेट जगतात नेतृत्वस्थानी महिला असण्याच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागला असून, पहिल्या स्थानावर फिलिपिन्स, दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका आहे.
- ‘व्यवसायातील महिला २०२१’ या नावाच्या अहवालानुसार, जागतिक पातळीवर उच्चाधिकार पदांवर महिलांचे प्रमाण सरासरी ३१ टक्के आहे. भारतात या सरासरींपेक्षा महिलांना अधिक संधी दिली गेल्याचे दिसून आले आहे.
- वरिष्ठ व्यवस्थापनात किमान एक महिला असण्याचे प्रमाण जगात वाहून ९० टक्के झाले असताना भारतात ९८ टक्के झाले आहे. मिड-मार्केट व्यवसायात सीईओ पदी महिलांचे प्रमाण जागतिक पातळीवर २६ टक्के असताना भारतात ते ४७ टक्के आहे.
- ‘ग्रँट थॉर्नटन’च्या भागीदार पल्लवी बाखरू यांनी सांगितले की, २०२० मधील आव्हानात्मक स्थितीत घर आणि काम यातील सीमारेषा धूसर झाल्या आहेत. अशा स्थितीत महिलांना उच्चस्थानावर जागा देण्यासाठी व्यवसायांनी केलेली कृती उत्तम आहे.
- स्री पुरुषांना समान संधी देण्याच्या बाबतीत भारतीय कंपन्या चांगले काम करीत आहेत. जवळपास ५५ टक्के भारतीय कंपन्यांनी आपल्या श्रमशक्तींत स्री-पुरुषांना समान संधी दिली आहे. ४९ टक्के कंपन्या समावेशक धोरण अवलंबित आहेत.