भारतीय अंतराळ संघटना

भारतीय अंतराळ संघटना

  • पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबरला भारतीय अंतराळ संस्थेची (इंडियन स्पेस असोसिएशन-ISpA) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून स्थापना केली.
  • ही अंतराळ आणि उपग्रह कंपन्यांची प्रमुख उद्योग संघटना असेल.
  • घोषवाक्य : ‘भूमंडल से ब्रह्मांड तक’
  • ध्येय आणि उद्दिष्टे: ISpA हे भारतीय खाजगी क्षेत्रातील अंतराळ उद्योगाचे व्यासपीठ बनण्याचे आणि भारत सरकार व अंतराळ उद्योग क्षेत्रातील इतर प्रमुख भागधारकांना या क्षेत्रात राष्ट्र स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच जागतिक सेवा प्रदाता बनवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
  •  ISpA ने भारत सरकारला भारत आत्मनिर्भर आणि अंतराळ क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनवण्याच्या दृष्टीने योगदान देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
  • त्याच्या संस्थापक सदस्यांमध्ये भारती एअरटेल, लार्सन अँड टुब्रो, नेल्को (टाटा ग्रुप), वनवेब, मॅपमीइंडिया, वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे. 
  • इतर मुख्य सदस्यांमध्ये गोदरेज, ह्यूजेस इंडिया, अनंत टेक्नॉलॉजी लिमिटेड, अझिस्टा-बीएसटी एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, बीईएल, सेंटम इलेक्ट्रॉनिक्स, मॅक्सर इंडिया यांचा समावेश आहे.
  • लेफ्टनंट जनरल ए.के. भट्ट (निवृत्त) यांची भारतीय अंतराळ संघटनेचे पहिले महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Contact Us

    Enquire Now