भारतात ११८ वर्षांनंतर फुलले ऑर्किड प्रजातीचे फूल
- भारतात तब्बल ११८ वर्षांनंतर ऑर्किड फुलाची एक दुर्मिळ प्रजाती सापडली आहे.
- उत्तर प्रदेशातील दुधवा टायगर रिझर्व्हमध्ये वन अधिकारी आणि वन्यजीव तज्ज्ञांच्या निरीक्षणादरम्यान हे फूल पाहायला मिळाले.
ऑर्किडप्रजातीविषयी :
- या फुलाचे वैज्ञानिक नाव Eulophia obtusa असे आहे. या फुलाची ग्राऊंड ऑर्किड अशीही ओळख आहे.
- IUCN च्या रेड यादीत विलुप्त झालेल्या यादीत नाव नोंदवण्यात आलेल्या या फुलाची ही प्रजाती शेवटी पीलीभीत येथे १९०२ मध्ये पाहायला मिळाली होती.
- भारतात ऑर्किडच्या एकूण १२५६ प्रजाती आढळतात. त्यापैकी ३८८ प्रजाती या स्थानिक स्वरूपाच्या असून त्या फक्त भारतातच आढळतात.
- ३०० स्थानिक प्रजाती पश्चिम घाटात आढळतात.
IUCN विषयी : International Union For Conservation of Nature (स्थापना – १९४८) मुख्यालय ग्लांड (स्वित्झर्लंड) रेड लिस्टचे मुख्यालय युनायटेड किंग्डम (१९९४).