भारतात आणखी ‘100 विमानतळे, हेलिपॅड, वॉटरड्रोन्सची’ निर्मिती
- भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (Airports Authority of India AAI) UDAN (उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत 2024 पर्यंत आणखी 100 विमानतळे, हेलिपॅड्स, वॉटरड्रोन्सची निर्मिती करण्याचे ठरवले आहे.
- UDAN च्या चौथ्या वर्धापन दिनी नागरी विमान वाहतूक(civil aviation) सचिव प्रदीप सिंग खरोला व AAI चे अध्यक्ष अरविंद सिंग यांनी आभासी परिषदेतून याची घोषणा केली.
UDAN योजना –
- ही प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी योजना आहे.
- तिचा उद्देश प्रादेशिक मार्गावर परवडणारी, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य व फायदेशीर हवाई यात्रा उपलब्ध करून देणे आहे.
- उडान योजनेअंतर्गत मार्गांची संख्या सध्या 766 आहे.
- 27 एप्रिल 2017 ला या योजनेची सुरुवात झाली व ती 10 वर्षांसाठी चालविली जाईल. त्यानंतर ती वाढविलीही जाईल.
- उड़ान योजनेची अंमलबजावणी AAI ही एजन्सी करते.
- सुमारे ‘50 चालू व चालू नसणारी विमानतळे( ज्यात ५ हेलिपॅड्स)’ व 285 मार्गांचा यात आणखी समावेश करण्यात आला आहे.
- नागरी विमान वाहतूक मंत्रालय (MoCA) उडान योजना शाश्वत बनवण्यासाठी व कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होण्यासाठी कार्यरत आहे.
- प्रादेशिक विमानतळांच्या आर्थिक व्यवहार्यतेचा आग्रह न धरता मार्गांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उड़ान योजनेअंतर्गत व्हायाबिलिटी गॅप फंडिंग (VGF) च्या स्वरूपात आर्थिक सहाय्य मिळते.
- डिसेंबर 2019 रोजी ईशान्येकडील भाग, हिली स्टेट्स, बेटे यांसाठी उडानची चौथी फेरी ‘UDAN 4.0’ सुरू करण्यात आली.
नागरी विमान वाहतूक मंत्रालय (Ministry of Civil Aviation)
केंद्रीय मंत्री = हरदीपसिंग पुरी
मुख्यालय = नवी दिल्ली