भारतातील १४ व्याघ्र प्रकल्पांना सीएटीएस दर्जा

भारतातील १४ व्याघ्र प्रकल्पांना सीएटीएस दर्जा

  • २९ जुलै म्हणजेच जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आभासी कार्यक्रमाच्यावेळी देशातील १४ व्याघ्र प्रकल्पांना वाघांचे उत्तम संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल संवर्धन निश्चिती व्याघ्र दर्जा (CA|TS) मिळाल्याचे जाहीर करण्यात आले.
  • यावेळीच ‘बिबटे, मांसभक्षी आणि मोठे तृणभक्षी यांची सद्यस्थिती-२०१८’ या विषयावरील अहवालाचेही प्रकाशन झाले.
  • तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) चे त्रैमासिक ‘स्ट्राईप्स’ (STRIPES) चेही प्रकाशन करण्यात आले.

संवर्धन निश्चिती/व्याघ्र दर्जा (Conservation Assured|Tiger Standards : CA|TS)

अधिकृत घोषणा : २०१३

  • व्याघ्र अस्तित्व असलेल्या जागतिक संघटना (TRCs) व व्याघ्र आणि संरक्षित प्रदेशांच्या तज्ज्ञांनी यास विकसित केले आहे.
  • CA|TS निकषांतर्गत व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारे व्यवस्थापन संवर्धनासाठी पूरक आहे की नाही हे तपासले जाते.
  • ग्लोबल टायगर फोरम (GTF) वाघ्र संवर्धनावर काम करणारी एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि जागतिक वन्यजीव निधी-भारत हे  भारतातील CA|TS मूल्यांकनासाठी राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाचे दोन अंमलबजावणी भागीदार आहेत.

CA|TS मानांकन प्राप्त भारतातील व्याघ्र प्रकल्प :

क्र. व्याघ्र प्रकल्प राज्य
१) मानस आसाम
काझीरंगा
ओरांग
मदुमलाई तमिळनाडू
अन्नामलाई
पेंच महाराष्ट्र
बंदीपूर कर्नाटक
सातपुडा मध्य प्रदेश
कान्हा
१० पन्ना
११ दुधवा उत्तर प्रदेश
१२ वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प बिहार
१३ सुंदरबन पश्चिम बंगाल
१४ पारंबीकुलम केरळ

‘बिबटे, मांसभक्षी आणि मोठे तृणभक्षी यांची सद्यस्थिती-२०१८’ अहवाल

  • देशातील एकूण व्याघ्र अस्तित्व असलेल्या प्रकल्पांमध्ये २०१८ सालच्या अंदाजे मोजणीनुसार, १२,८५२ बिबटे असल्याचे आढळले आहे.
  • २०१४ साली ही संख्या ७९१० इतकी नोंदली गेली होती.
  • ही गणना देशातील १८ व्याघ्र प्रकल्पांमध्ये करण्यात आली होती.
  • या अहवालातील निष्कर्षानुसार, व्याघ्र संवर्धनामुळे संपूर्ण परिसंस्थेचे संवर्धन होते हे सिद्ध झाले आहे.

भारतातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प

अ) प्रोजेक्ट टायगर, १९७३

ब) राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, २००५

भारताची व्याघ्र संवर्धन स्थिती :

अ) ७० टक्क्यांपेक्षा अधिक वाघ भारतात आढळतात.

ब) भारतामध्ये १८ राज्यांत पसरलेल्या ५१ व्याघ्र प्रकल्पात २,९६७ इतके वाघ आहेत.

क) वाघांच्या संवर्धनाबाबत असलेल्या सेंट पीटर्सबर्ग घोषणेच्या (२०१०), २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट भारताने चार वर्षांपूर्वीच पूर्ण केले आहे.

वाघांची संवर्धन स्थिती :

अ) भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२

ब) इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (IUIN) : लाल यादी – चिंताजनक (Endangered)

क) वन्यप्राणी आणि वनस्पतींच्या संकटग्रस्त प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील परिषद (CTIES) : परिशिष्ट :I

Contact Us

    Enquire Now