भारतातील पहिली चालक विरहित मेट्रो रेल्वे धावण्यास सज्ज
- राजधानी दिल्लीमध्ये देशातील सर्वप्रथम विनाचालक मेट्रोचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 28 डिसेंबर रोजी उद्घाटन होणार आहे.
- 2002 साली 25 डिसेंबर या तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्याा दिवशी त्यांच्याच हस्ते दिल्लीतील मेट्रो सेवेचे कामकाज सुरू झाले होते.
- याच दिनाचे औचित्य साधून विनाचालक मेट्रोचे उद्घाटन करण्याची घोषणा भारत सरकारने केली. 38 किलोमीटर लांबीची मॅजेंटा लाइन (Line 8) ही पश्चिमेला जनकपुरी (दिल्ली) ते बॉटॅनिकल गार्डन (यूपी) यांना जोडते.
- तांत्रिक मदतीसाठी तात्पुरत्या काळासाठी मेट्रोमध्ये चालकाची व्यवस्था केली आहे ज्यामुळे प्रवाशांना काही मदत लागल्यास अडचणी दूर करता येतील.
- नवीन मेट्रो गाड्यांच्या ऑटोमेशनची चाचणी घेण्यात आली, ज्यात अनअटेंडेड ट्रेन ऑपरेशन्स (UTO) आणि कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (CBTC) सिग्नलिंग सिस्टिम सुसज्ज आहे. त्यामुळे त्याची वारंवारता लक्षणीय पद्धतीने वाढेल.
- दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अंतर्गत 10 मेट्रो लाईन्स ज्यामध्ये 242 स्थानके आहेत. ज्यावर सरासरी दररोज 26 लाख प्रवासी प्रवास करतात.
- सुरुवातीला दिल्ली मेट्रो 8.2 किलोमीटरच्या अंतरामध्ये शहादरा ते तीस हजारी या दरम्यान फक्त सहा स्थानकांना जोडत धावत होती.
- दिल्ली मेट्रोचे नाव जगभर झाले, यामागे ई. श्रीधरन यांचा वाटा आहे.
- याआधी भारतामध्ये 1984 पासून कोलकाता मेट्रो कार्यरत आहे.
इलात्तुवलापिल श्रीधरन
- त्यांना ‘मेट्रो मॅन’ म्हणून ओळखले जाते.
- दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन अंतर्गत त्यांनी 1995 ते 2012 मध्ये कार्य केले. त्यावेळी 2002 रोजी त्यांनी दिल्ली मेट्रोचा पाया रोवला.
- भारतातील सर्वप्रथम मेट्रो कोलकाता मेट्रो तसेच कोकण रेल्वे, पंबन ब्रिज, दिल्ली मेट्रो अशा विविध प्रकल्पांवर त्यांनी कार्य केले आहे.
- भारत सरकारने 2001 साली पद्मश्री, 2008 साली पद्मविभूषण पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले.
- फ्रान्स सरकारने 2005 साली chevalier de la legion d’Honneur (Knight of legion of Honour) पुरस्काराने सन्मानित केले.