भारतातील डिजिटल पेमेंटमध्ये ३०.१९% वाढ

भारतातील डिजिटल पेमेंटमध्ये ३०.१९% वाढ

  • आरबीआयच्या आकडेवारीनुसार, मार्च २०२१ या सरत्या वित्तीय वर्षातील डिजिटल पेमेंटमध्ये ३०.१९ टक्के वाढ झाली आहे.

 

महत्त्वाचे :

 

१) नव्याने स्थापन झालेल्या आरबीआय डिजिटल पेमेंट इंडेक्स (RBI-DPI) अहवालानुसार मार्च २०२१ रोजी २०७.८४ असणार्‍या डिजिटल पेमेंटमध्ये २ जुलै पर्यंत २७०.५९ एवढी वाढ झाली आहे.

२) या इंडेक्समधील ही वाढ अलिकडच्या काही वर्षांमधील भारतातील डिजिटल पेमेंटमध्ये होणारी वेगवान वाढ व त्यावरील अवलंबन दर्शविते.

 

RBI – डिजिटल पेमेंट इंडेक्स :

 

१) देशभरातील पेमेंट डिजिटलायझेशनच्या व्याप्तीची नोंद घेण्यासाठी सुरुवात.

२) आधार वर्ष : मार्च २०१८

३) मार्च २०१९, मार्च २०२० साठी डीपीआय अनुक्रमे १५३.४७ आणि २०७.८४ पर्यंत होता.

४) प्रकाशन : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

५) RBI – DPI मार्च २०२१ पासून ४ महिन्यांच्या अंतराने आरबीआयच्या संकेतस्थळावर अर्ध-वार्षिक आधारावर प्रकाशित केले जाते.

६) मापदंड :

१) पेमेंट सक्षम करणारे (Payment Enablers – weight २५%)

२) पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर – मागणीजन्य घटक (१०%)

३) पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर – पुरवठाजन्य घटक (१५%)

४) देयक कामगिरी (४५%)

५) ग्राहक केंद्रीकरण (५%)

 

नोट :

 

  • यूएस – आधारित पेमेंट कंपनी ACI च्या अहवालानुसार २०२५ पर्यंत भारतातील एकूण पेमेंट व्हॉल्यूमच्या ७१.७ टक्के पेमेंट डिजिटल स्वरूपातील असेल, त्यात रोख आणि चेकच्या स्वरूपातील २८.३ टक्के पेमेंटचा समावेश असेल.

Contact Us

    Enquire Now