भारतातील जंगलामध्ये लवकरच चित्त्यांचे आगमन
- भारतातून चित्ता पूर्णपणे नामशेष झाल्याचे अधिकृतरीत्या घोषित केल्यानंतर जवळजवळ सात दशकांनंतर आफ्रिकेतून चित्ता स्थानांतरित
- मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात येणार आहे.
- राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या बैठकीत हा आराखडा ठेवण्यात आला.
- जगातील हा पहिला आंतरराष्ट्रीय चित्ता स्थानांतरण प्रकल्प आहे.
- जगातील सर्वात वेगवान धावणाऱ्या प्राण्याला सरकारने नामशेष म्हणून घोषित केले होते.
- २०१२ पासून भारतात चित्ता आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या. शेवटी ऑगस्ट २०१९मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाला मंजुरी दिली.
- २०२०मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सुकाणू समितीच्या उपसमितीने मध्यप्रदेशसह झारखंड आणि राजस्थानमध्येही चित्ता आणता येईल का याची चाचणी केली.
- मध्यप्रदेशातील कुनो या राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकन चित्ता आणण्यात येणार आहे.
- ७५० चौरस किलोमीटर्समध्ये हे उद्यान आहे.
- पहिल्या टप्प्यात १२ ते १५ चित्ते आणण्यात येणार आहेत. व पुढच्या पाच वर्षांत ४० ते ५० चित्ते पुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
- नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील चित्ता येत्या चार ते सहा महिन्यांत भारतात पोहोचणार आहेत.
- १९५२ मध्ये चित्ता देशातून नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते.
भारतातील व्याघ्र प्रकल्प
क्र. | राज्य | व्याघ्र प्रकल्पाचे नाव |
१. | आंध्रप्रदेश | नागार्जुनसागर, श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प |
२. | अरुणाचल प्रदेश | कमलांग व्याघ्र प्रकल्प नामदाफा |
३. | आसाम | कांझीरंगा, ओरंग, नमेरी, मानस व्याघ्र प्रकल्प |
४. | बिहार | वाल्मिकी |
५. | झारखंड | पलमारु व्याघ्र प्रकल्प |
६. | कर्नाटक | बंदीपूर, बंध्रा, नागरहोले व्याघ्र प्रकल्प |
७. | केरळ | पेरियार व्याघ्र प्रकल्प |
८. | मध्यप्रदेश | बांधवगढ, पेंच, कान्हा, पन्ना व्याघ्र प्रकल्प |
९. | महाराष्ट्र | बोर, नागझीरा, मेळघाट, Tadoba |
१०. | ओदिशा | शिमलीपल |
११. | राजस्थान | रणथंबोर |
१२. | तमिळनाडू | मदुमलाई, सत्यमंगलम |
१३. | उत्तरप्रदेश | दुधवा, पिलीभीत |
१४. | उत्तराखंड | जीम कॉर्बेट |
१५. | पश्चिमबंगाल | सुंदरबन |