भारतातील एमआरएनए लसीचा फायझरचा अर्ज मागे

भारतातील एमआरएनए लसीचा फायझरचा अर्ज मागे

 • भारताच्या औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागणारी फायझर ही पहिली कंपनी आहे.
 • या कंपनीने जर्मनीच्या बायोएनटेकच्या मदतीने कोरोनासाठी एमआरएनए (MRNA) लस तयार केली आहे.
 • कंपनीकडे या लसीबाबत भारताच्या औषध नियंत्रण संस्थेने अधिक माहिती मागितल्यामुळे फायझरने केलेला अर्ज माघारी घेतला.
 • हा अर्ज कोविड-१९ लसीच्या आपत्कालीन वापरासंबंधी होता.
 • भारतातील औषध व वैद्यक चाचण्या अधिनियम २०१९ नुसार नैदानिक भारतीय लोकांवरील नैदानिक चाचण्या वगळून परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती.

फायझर – बायोएनटेक लस

 • ही आरएनए (RNA – Ribo – Nucleio Acid) प्रकारची लस
 • -७० सेल्सियस तापमानात साठवावी लागते.
 • डोस : दोन, तीन आठवड्यांच्या अंतराने
 • ब्रिटन – सर्वाधिक वापरकर्ता
 • यात कोरोनाचा जेनेटिक कोड असून कोरोनाबाधित रुग्णाच्या शरीरात सोडतात.

Contact Us

  Enquire Now