भारतातर्फे मॉरिशसला भाडेकरारावर डॉर्नियर विमान
- भारताने आपल्या सागर (SAGAR – Security and Growth for all in the Region) प्रकल्पांतर्गत मॉरिशसला भाडेकरारावर एक डॉर्नियर विमान दिले.
- हिंदी महासागरातील सुरक्षा आणि गस्त यासाठी हे विमान देण्यात आले आहे.
- सागर (SAGAR)
- सुरुवात – २०१५
- उद्देश – भारताच्या सागरी सीमा लागणाऱ्या राष्ट्रांसोबत संबंध बळकट करणे.
- माहितीचे आदानप्रदान, पायाभूत सुविधा आणि किनाऱ्यांचे संरक्षण यासाठी मदत करणे.
- महत्त्वाचे – मिशन सागर – हे अभियान कोविड-१९ काळात शेजारी राष्ट्रांना मदत करण्यासाठी १० मे २०२० रोजी नौदलामार्फत सुरू करण्यात आले आहे. हे अभियान SAGAR प्रकल्पांतर्गतच आहे.
डॉर्नियर विमाने –
- अत्याधुनिक विविधता असलेले भारतीय बनावटीचे बहुउद्देशीय १९ आसनी हलके विमान
- हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड द्वारे निर्मित, युरोपियन युनियनच्या हवाई सुरक्षा संस्थेने मान्यता दिल्याने व्यापारी उड्डाणास वापर केला जाईल.
- त्याआधी फक्त समुद्री सुरक्षा आणि टेहळणीसाठी उपयोग केला जाई.